लक्ष्मण मानेंवर ३५ कोटींचा मानहानीचा दावा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांच्यावर अब्दुल रहमान अंजरिया यांनी ३५ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. लक्ष्मण माने यांनी आपल्यावर खोटे आणि तथ्यहीन आरोप केल्याचा दावा करून त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषद घेऊन माफी मागावी अशी मागणी अंजरिया यांनी केली आहे. अंजरिया हे आरएसएसमध्ये होते. त्यांनी भाजपमध्ये काम केले होते. असा आरोप काही दिवसांपूर्वी लक्ष्मण माने यांनी केला होता.

तसेच वंचितच्या तिकीटावर अंजरिया यांनी निवडणूक लढवली यावर देखील माने यांनी आक्षेप घेतला होता. लक्ष्मण माने यांनी केलेले आरोप तथ्यहिन असल्याचा दावा अंजरिया यांच्या वकीलांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनतर लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकर आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. तसेच आंबेडकर यांच्या कार्य़पद्धतीवर आक्षेप घेत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी लक्ष्मण माने यांनी केली होती.

वंचित बहुजन आघाडी आता वंचितांचा पक्ष राहिला नसून त्यात भाजप आणि संघाचे लोक घुसल्याचा आरोप माने यांनी पडळकरांवर केला होता. त्यानंतर अंजरिया यांच्यावर माने यांनी टीका केली होती.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like