चंद्रकांत खैरेंचा पराभव म्हणजे ‘माझा’ पराभव : शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबादमधून सलग चार वेळा खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव पचवणं शिवसेनेला अवघड जात आहे. चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव हा माझा पराभव आहे असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. जालना येथे एका सभेत ते बोलत होते.

चंद्रकांत खैरे यांच्या झालेल्या पराभवाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की , ‘चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव हा माझा पराभव आहे, काही झालं तरी औरंगाबाद सोडणार नाही. लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या यशाबाबत शंका उपस्थित करण्यात येत होत्या. मात्र शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. दिल्लीत मला जो काही मानसन्मान मिळत आहे, तो तुमच्यामुळेच मिळत आहे.’

उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जालना येथे आले होते. शिवसेना दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी नेहमी त्यांच्यासोबत राहील, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

पराभव पाहण्यापेक्षा मला मरण का आलं नाही? – चंद्रकांत खैरे

मी कायम शिवसेनेसाठी आणि लोकांसाठी काम केलं. ही माझी शेवटची निवडणूक होती. हा पराभव बघावा लागणं हे क्लेशकारक आहे. हा पराभव पाहाण्याआधी मला मरण का आलं नाही असे विधान चंद्रकांत खैरे यांनी काल शिवसैनिकांच्या मेळाव्यात केले होते.

चंद्रकांत खैरे यांचा पराभव –

औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला मनाला जातो. अनेक नाट्यमय घडामोडींमुळे गाजलेल्या औरंगाबाद मतदार संघात शेवट्पर्यंत चुरशीची लढत झाली होती . तिरंगी झालेल्या या लढतीत एमआयएम व वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांचा विजय झाला.

शिवसेनेतून बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणारे हर्षवर्धन जाधव व नोटा यांच्यामुळे शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचे मताधिक्य घटले व त्यांना ४,४९२ मतांनी पराभव पत्करावा लागला. चंद्रकांत खैरे हे पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

आरोग्य विषयक वृत्त – 

गरोदरपणातील काही अविश्वसनीय गोष्टी, ज्या सत्य आहेत

पहाटे सेक्स केल्याने हार्ट अटॅकचा धोका होतो कमी

धक्कादायक ! कुपोषणामुळे ४ वर्षांत ९ हजार बालकांचा मृत्यू

हवेच्या प्रदुषणामुळे ही होतो अनियमित मासिक पाळीचा त्रास

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like