‘आयएनएस खांदेरी’ ही अत्याधुनिक पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल

पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘खांदेरी’ या अत्याधुनिक पाणबुडीचा समावेश करण्यात आला. मुंबईमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या पाणबुडीचे लोकार्पण करण्यात आले. स्कॉर्पिन श्रेणीतील ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ठ करण्यात आली आहे.

भारत आता पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यास सक्षम आहे. २६/११ प्रमाणे पुन्हा एकदा कट रचला जात होता मात्र कोणीही देशातील शांतात भंग करण्याचा प्रयत्न केला तर नौदलाकडून त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल असे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

खांदेरी हे एका माशाचे नाव आहे. जो मासा समुद्राच्या तळापर्यंत जाऊन शिकार करू शकतो अशी माहितीही यावेळी राजनाथ सिंह यांनी दिली.

अत्याधुनिक सुविधांनीयुक्त अशी ही पाणबुडी आहे. पाणबुडीचा तिच्या तरंगावरून पाण्यामध्ये असताना तपास लागतो मात्र ही पाणबुडी इतकी अत्याधुनिक आहे की या पाणबुडीचा आवाज देखील येत नाही. तसेच शत्रूवर थेट हल्ला करण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे.

कशी आहे नेमकी ही पाणबुडी ?

३७ नौसैनिक तैनाद होण्याची क्षमता
कमाल ताशी वे ३५ ते ४० किमी
६७ मीटर लांब,६.२ मीटर रुंद व १२.३ मीटर उंच आणि वजन १.५५० टन इतके आहे.
कलवरी वर्गातील ही दुसरी पाणबुडी आहे.
रडार, सोनार, इंजिन तसेच अनेक लहानमोठी उपकरणे यामध्ये देण्यात आली आहे.
तब्बल ४५ दिवस पाण्यामध्ये राहण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे.

पाण्यातील युद्धामध्ये पाणबुडी महत्वाची भूमिका बजावते. पाणबुडी पाण्याखाली असल्यामुळे कोणताही देश कोणत्याही देशावर पाण्यातून थेट हल्ला करू शकत नाही त्यामुळे नौदलामध्ये पाणबुडीचे खूप महत्व आहे.