विजयादशमीला फ्रान्समध्ये राफेलसह शस्त्रांची पुजा करणार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दसर्‍याचा हा वाईटावर विजय मिळवण्याचा सण आहे. या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता. या सणाचे औचित्य साधून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 8 ऑक्टोबरला राफेलचे पहिले विमान आणण्यासाठी जाणार आहेत. याचवेळी ते या लढाऊ विमानाची पूजा करतील तसेच या विमानातून उड्डाणही करतील. मागील वर्षी बीएसएफ जवानांसह राजनाथ सिंह यांनी बिकानेरमध्ये शस्त्र पूजन केले होते.

8 ऑक्टोबरला वायुसेना दिवस आहे. राजनाथ सिंह फ्रान्सच्या बोर्डेक्स येथील मॅन्युफॅक्चरिंग प्लँटमध्ये जातील, तेथून राफेल ताब्यात घेण्यात येईल. हवाई दलाची टीम संरक्षणमंत्र्यांसमवेत जाऊन राफेल घेण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करेल. या व्यतिरिक्त हवाई दलाचा फायटर पायलटही या टीमसह फ्रान्सला जाणार आहेत.

भारतीय हवाई दलाच्या काही वैमानिकांना राफेल लढाऊ उड्डाण करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यानंतर हे सर्व मिळून भारतीय राफेल लढाऊ विमानातील तीन वेगवेगळ्या भागात हवाई दलाच्या आणखी 24 पायलटला प्रशिक्षण देतील. त्यांचे प्रशिक्षण 2020 मे पर्यंत चालणार आहे.

सप्टेंबर 2016 मध्ये भारताने फ्रान्स सरकार आणि डसॉल्ट एव्हिएशनशी 36 राफेल विमानांसाठी करार केला होता. या विमानांना त्वरित हस्तांतरित करण्याचा सरकारचा प्रयत्न होता, कारण त्यांना त्वरीत सैन्यात समाविष्ट करण्यासाठी वायुसेनेकडून दबाव येत होता.

 

Visit : Policenama.com