संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी NCC कॅडेट्सच्या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी केलं APP लॉन्च

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी देशातील नॅशनल कॅडेट कोर्प्स(एनसीसी) कॅडेट्सच्या ऑनलाइन प्रशिक्षणात मदत करण्यासाठी मोबाइल अ‍ॅपप्लिकेशन लाँच केले. संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, कोरोना विषाणूमुळे लादलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर एनसीसी कॅडेट्सच्या प्रशिक्षणावर विपरीत परिणाम झाला आहे. नजीकच्या काळात शाळा व महाविद्यालये उघडण्याची शक्यता नसल्याने एनसीसी कॅडेट्सना डिजिटल माध्यमातून प्रशिक्षण दिले जावे.

निवेदनात म्हटले आहे की, ‘डीजीएनसीसी’ नावाच्या मोबाइल अ‍ॅपचा उद्देश एनसीसी कॅडेट्सला अभ्यासक्रम, प्रशिक्षण व्हिडिओ आणि वारंवार विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांसह सर्व प्रशिक्षण सामग्री प्रदान करते. अ‍ॅपमध्ये प्रश्न विचारण्याच्या पर्यायाचा समावेश करून इंटरॅक्टिव्ह बनविले गेले आहे. या पर्यायाचा वापर करून, कॅडेट्स प्रशिक्षण कोर्सशी संबंधित प्रश्न विचारू शकतात आणि त्यांचे उत्तर पात्र शिक्षकांच्या पॅनेलद्वारे दिले जाईल.

डिजिटल शिक्षणात एनसीसी कॅडेट्ससाठी उपयुक्त ठरेल अ‍ॅप
राजनाथ सिंह यांच्यासमवेत संरक्षण सचिव अजय कुमार, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा आणि मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. अ‍ॅप लॉन्च झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, आज एनसीसी कॅडेट्ससाठी मोबाईल ट्रेनिंग अ‍ॅप सुरू केले. हे अ‍ॅप एनसीसी कॅडेट्सचे देशव्यापी ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात मदत करेल. हे एनजीसी कॅडेट्ससाठी डिजिटल लर्निंगमध्ये उपयुक्त ठरेल आणि कोरोना विषाणूमुळे उद्भवणार्‍या अडचणींचा सामना करण्यास देखील मदत करेल.

राजनाथ यांनी एनसीसी कॅडेट्सशी केली चर्चा
दुसर्‍या ट्वीटमध्ये राजनाथ म्हणाले की, एनसीसी देशाला ऐक्य, शिस्त, सेवा या गोष्टी प्रदान करते. अ‍ॅप लाँच दरम्यान मी एनसीसी कॅडेट्सशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली. मी त्यांच्या यशस्वी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. संरक्षण मंत्री यांनी या कालावधीत एनसीसीच्या एक लाखाहून अधिक कॅडेट्सच्या योगदानाचे कौतुक केले, ज्यांनी कोरोना साथीच्या विरोधात लढाईत विविध कामांमध्ये फ्रंटलाइन कोरोना कामगारांना पाठिंबा दर्शविला.