….तर पाकिस्तानवर हल्‍ला करण्यासाठी भारतीय सैन्य पुर्णपणे तयार : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या वर्षी सरकारने बालाकोटमधील दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळ उध्वस्त केल्यानंतर असे सांगितले जात आहे की दहशतवादी पुन्हा एकदा या दहशतवादी तळांवर सक्रिय झाले आहेत. पाकच्या मदतीने हे दहशतवादी भारताविरोधात कारवाया करण्यासाठी पुन्हा एकदा या तळावर प्रशिक्षण घेत आहेत.

भारतील सैन्य तयार
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज तमिळनाडूमध्ये चेन्नईत आहेत तेथे ते भारतीय नौदलाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. यावेळी त्यांनी बालाकोटवरुन विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले, ते म्हणाले पाकिस्तान पुन्हा एकदा बालाकोटच्या दहशतवादी तळावर दहशतवाद्यांना सक्रिय करत आहे. परंतू चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण आपले सैन्य त्यांना तोंड देण्यासाठी पूर्णता: तयार आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी गृहमंत्र्यांना सांगितले होते की पाकिस्तानकडून येणारे शस्त्रास्त्र आणि हातबॉम्ब सीमेच्या पलीकडून येत आहेत. यावर संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, जे काही राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न असतील त्यासाठी आपले सैन्य पूर्णता: तयार आहे, त्यांना हरवण्यास सक्षम आहेत, मग ती सेना असेल किंवा वायू सेना, नौसेना.

500 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत
याआधी सेना प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सोमवारी चेन्नईमध्ये सांगितले की, पाकने पुन्हा एकदा बालाकोटमधील दहशतवादी तळांना सक्रिय केले आहे आणि जवळपास 500 पेक्षा जास्त घुसखोर भारतात घुसण्याच्या तयारी आहेत.

तर मुंबईत भारतीय तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शौर्याला आणि उत्कृष्ट सेवेला सन्मानित करण्यासाठीच्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की देशातील लोक सुरक्षित आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार अतिरिक्त प्रयत्न करत आहे, ज्यामुळे देशातील लोक राष्ट्र निर्माणात सर्वश्रेष्ठ योगदान देऊ शकतील.

संरक्षण मंत्री म्हणाले की मुंबईवरील दहशतवादी हल्ला समुद्र मार्गे झाला होता. परंतू सरकार यासाठी कटिबंध आहे की देशात अशी घटना पुन्हा घडणार नाही. यावेळी त्यांनी देशाच्या समुद्र सीमेच्या रक्षणाबद्दल देखील माहिती दिली. यशिवाय दिलासा मिशन आणि मादक द्रव्यांच्या तस्करीना रोखण्याच्या भूमिकेची देखील प्रशंसा केली.