संसदेत आज गृहमंत्र्यांची ‘कसब’ लागणार पणााला, चीन मुद्यावर होणार चर्चा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी चीन मुद्यावर होणार चर्चा होणार आहे. त्यामुळे गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे कसब पणाला लागणार आहे. पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण लोकसभेत माहिती देणार आहेत.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने काही महिन्यांपुर्वी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. दोन्ही देशांच्या सैन्य अधिकार्‍यांमध्ये तसेच मुत्सद्दी पातळीवर चर्चेच्या अनेक फेर्‍या पार पडल्या. पण चीन अजूनही मागे हटलेला नाही. उलट लडाख सीमेवरील पँगाँग सरोवर क्षेत्रात स्थिती आता आणखी स्फोटक आहे. त्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज लोकसभेत लडाख सीमेवर नेमकी काय परिस्थिती आहे, त्याबद्दल माहिती देणार आहेत.

काँग्रेसने कालच लडाखमधील घुसखोरीच्या मुद्यावर चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव मांडला होता. राजनाथ सिंह आज संसदेत या मुद्यावर जेव्हा बोलतील, ते पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवरील सीमावादासंदर्भात भारत सरकारचे पहिले अधिकृत वक्तव्य असल्याचे बोलले जात आहे. गलवान खोर्‍यात झालेल्या रक्तरंजित संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले तर चीनचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाले होते.