Defence Ministry Jobs | संरक्षण मंत्रालयात पदवीधर आणि 10 वी पाससाठी नोकरी, तात्काळ करा अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Defence Ministry Jobs | प्रधान संचालनालय, संरक्षण संपदा, भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, सदर्न कमांड, पुणे कॅन्टोन्मेंट यांनी कनिष्ठ हिंदी अनुवादक, उपविभागीय अधिकारी आणि हिंदी टंकलेखक या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन करावयाचा आहे. https://dagshai.cantt.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन भरतीचा अर्ज मिळवता येईल. (Defence Ministry Jobs)

 

नोटीसनुसार, 18 ते 30 वयोगटातील लोक ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटरसाठी अर्ज करू शकतात. तर उपविभागीय अधिकारी आणि हिंदी टंकलेखक यांच्यासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे.

 

रिक्त जागा तपशील

कनिष्ठ हिंदी अनुवादक – 7 पदे

उपविभागीय अधिकारी – 89 पदे

हिंदी टायपिस्ट – 1 पद

 

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता

– कनिष्ठ हिंदी अनुवादक
मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी.

 

– उपविभागीय अधिकारी
मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच सर्वेक्षण किंवा ड्राफ्ट्समनशिपमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

 

– हिंदी टायपिस्ट
किमान 25 शब्द प्रति मिनिट टायपिंग गतीसह 10वी उत्तीर्ण. (Defence Ministry Jobs)

 


कुठे अर्ज करायचा
उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज पाठवण्याचा पत्ता असा आहे – प्रिन्सिपल डायरेक्टर, डिफेन्स इस्टेट्स, सदर्न कमांड, ईसीएचएस क्लिनिक जवळ, कोंढवा रोड, पुणे, महाराष्ट्र – 411040.

 

उमेदवारांनी लिफाफ्याच्या वरच्या बाजूला पदाचे नाव लिहावे. सूचनेनुसार, भरती परीक्षा पुणे/दिल्ली/बॅरकपूर कॅन्ट येथे होणार आहे.

 

Web Title :- Defence Ministry Jobs | defence ministry jobs 2022 for junior hindi translator officer and typist posts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Lata Mangeshkar | गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत अद्यापही सुधारणा नाही, डॉक्टर म्हणाले – ‘सर्वांनी प्रार्थना करा’

 

Pune Crime | पुण्यात 96 लाखांची फसवणूक करणार्‍या व्यावसायिक गणेश केंजळे व महेश केंजळेंना अटक; दोन दिवसांची पोलिस कोठडी

 

Pune Crime | पुण्यात 25 वर्षीय वहिनीचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ केला सावत्र दीरानं शूट, त्यानंतर धमकी देऊन बलात्कार; हिंजवडी परिसरातील घटना

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या