शाळकरी मुलींच्या सरंक्षणासाठी आजपासून रक्षा अभियान

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन

शाळकरी मुलामुलींचे बेपत्ता होण्याचे प्रकार, छेडछाड, अत्याचार असे प्रकार वाढल्याने राज्यात मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे राज्य सरकारने विविध उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली आहे. यामुळे आजपासून रक्षा अभियान सुरू करण्यात येत आहे. यासाठी शाळांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B00VWM11HQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’90bf645f-b5cf-11e8-932b-7317e4e1e451′]

शाळकरी मुलगी बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा नोंदवूनही अनेक बेपत्ता मुलींचा शोधच लागला नसल्याने, शाळा, परिवार वा सार्वजनिक ठिकाणी मुले सुरक्षित राहावीत याकरिता विशेष रक्षा अभियान राबविण्यात येत आहे. आजपासून राज्यात ही मोहीम सुरू  करण्यात आली असून प्रत्येक वर्गातील मुलांची तीन वेळा हजेरी घेणे सक्तीचे करण्यात आले आहे.

खडकवासला धरणाच्या पाण्यात मिसळतेय सांडपाणी 

मुले शाळेच्या आवारात असेपर्यंत त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असणार आहे. कोणीही अनधिकृत व्यक्ती प्रवेश करणार नाही याची दक्षता घ्यावी. शाळेच्या बसमधून प्रवास करणारी शेवटची मुलगी घरी पोहोचेपर्यंत या बसमध्ये महिला सेविका किंवा शिक्षिका असावी, शाळा सुटल्यानंतर कोणीही विद्यार्थी शाळेच्या आवारात राहिला नसेल याची खातरजमा करावी, मुलगे आणि मुलींसाठीची  स्वच्छतागृहे एकमेकांपासून पुरेशा अंतरावर असावीत. अत्याचाराची तक्रार दाखल करण्याबाबत तसेच राष्ट्रीय बालहक्क आयोगाने तयार केलेल्या सुविधेची माहिती पालकांना पोहोचविण्याकरिता राज्य बालहक्क आयोगाने तयार केलेल्या चिराग या मोबाइल अ‍ॅपची माहिती सर्व विद्यार्त्यांना देऊन या अ‍ॅपचा वापर करण्यासंबंधी पालकांना मदत करावी, असेही राज्य सरकारने शाळांना बजावले आहे. तसेच बालकांच्या सुरक्षिततेसंबंधातील उपाययोजना आखताना पालकांच्या सूचना विचारात घेण्याकरिता शाळांमध्ये सूचना पेटी लावणेही सक्तीचे करण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B075B67K4K’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a64a6084-b5cf-11e8-af3f-91bacf6c91e4′]

या मोहिमेनुसार राज्यातील सर्व शाळांच्या प्रवेशद्वारांवर तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा, अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांना या आदेशाची अंमलबजावणी सक्तीची आहे. प्रत्येक शाळेच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांच्या ताफ्यात महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी, असे आदेश सरकारने दिले आहेत.

You might also like