संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांची ‘तेजस’ भरारी, ‘पाक-चीन’च्या ‘थंडरबर्ड’ पेक्षाही ‘दमदार’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज स्वदेशी लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेत एक नवीन इतिहास रचला आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा कोणत्याही सरंक्षण मंत्र्याने तेजसमधून भरारी घेण्याची हि पहिलीच वेळ होती. तीन वर्षांपूर्वी भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल झालेल्या तेजस या विमानाचे लवकरच अपग्रेडेड व्हर्जन देखील येणार आहे. 4 जानेवारी 2001 रोजी तेजस या विमानाने पहिले उडान घेतले होते.

डिसेंबर 2017 मध्ये भारतीय वायुसेनेने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला 83 अपग्रेडेड तेजस विमाने बनवण्याची जबाबदारी दिली आहे. या एकूण विमानांची किंमत जवळपास 50 हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर्षी 21 फेब्रुवारी रोजी भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात यातील काही विमाने दाखल झाली आहेत. डीआरडीओच्या परवानगीनंतर हि विमाने भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

चीन आणि पाकिस्तान देखील तेजस विमानाला घाबरतात
तेजस हे विमान संपूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे. याची डिझाईन देखील भारतात तयार करण्यात आले आहेत. पाकिस्तान आणि चीनच्या थंडरबर्ड विमानापेक्षा देखील ताकदवर आहे.

अटल बिहारी वाजयेपी यांनी दिले होते नाव
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे तयार केलेल्या या विमानाला भारतचे माजी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांनी तेजस हे नाव दिले होते. हे नाव संस्कृत भाषेतून घेण्यात आले आहे. याचा अर्थ हा सर्वात ताकदवर ऊर्जा असा होतो.

visit : Policenama.com