‘बॉर्डर’वर शत्रूला घेरण्यासाठी ‘रेकॉर्ड’ वेळेत तयार केले गेले 6 पूल, संरक्षण मंत्र्यांनी उद्घाटन करून देशाला केलं ‘समर्पित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पाकिस्तानकडून सतत होणार्‍या सीजफायरचे उल्लंघन केल्यानंतर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (बीआरओ) विक्रमी वेळेत सीमेवर ६ पूल बांधले आहेत. गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरमधील हे ६ पूल देशाला समर्पित केले. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बीआरओने बांधलेल्या या पुलांचे उद्घाटन केले. या माध्यमातून सैन्याला सीमेवर पोहोचणे खूप सोपे होईल. याशिवाय या क्षेत्रात आर्थिक क्रियाकलापांनाही चालना मिळेल.

अत्यंत महत्वाचे आहेत हे पूल

जम्मू-काश्मीरमध्ये तयार केलेल्या ६ पुलांपैकी १६० मीटर लांबीचा तरनाह-१ आणि ३०० मीटर लांबीचा तरनाह-२ सह चार पूल बलवान, घोडावाला, पहाडीवाला आणि पानियाली पुलाचे उद्घाटन केले गेले. या पुलांच्या माध्यमातून सुमारे २१७ गावांतील ४ लाखाहून अधिक लोकांना ये-जा करणे सोपे होईल. तसेच लष्करी वस्तू आणि दैनंदिन वापरल्या जाणार्‍या वस्तू आता दूरवरील भागामध्ये सहज पोहोचवता येतील.

दोन वर्षात तयार

बीआरओने गेल्या दोन वर्षात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून २२०० किमी रस्ते तोडले आहेत आणि सुमारे ४२०० किमी रस्त्यांचे सर्फेसिंग केले आहे. या व्यतिरिक्त एकूण ५८०० मीटर स्थायी पूल तयार करण्यात आले आहेत. कोरोना काळातही बीआरओने आपले काम सतत चालू ठेवले. ईशान्येकडील हिमाचल, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि लडाख या सीमावर्ती भागात रस्ते व पूल बांधण्याचे काम सुरूच ठेवले.

अटल बोगद्याचेही काम लवकरच होणार पूर्ण

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, लवकरच अटल बोगद्याचेही काम पूर्ण करून देशाला समर्पित केले जाईल. सैन्याच्या गरजा लक्षात घेऊन लवकरच आणखी बरीच विकास कामे जाहीर केली जातील. तसेच जम्मूमध्ये १००० किमी रस्त्यांची कामे सुरू आहेत.