आता पाकिस्तानची ‘भंबेरी’ उडणार, भारतीय वायुसेनेची ‘पावर’ 200 ‘फायटर’ जेट्समुळे वाढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतावर वाकडी नजर ठेऊन असलेल्या शत्रूंना आता आणखी घाम फुटणार आहे कारण लवकरच भारतीय वायुसेना आपल्या ताफ्यात 200 फायटर जेट्स सामील करणार आहे. वायुसेनेची ताकद वाढवण्याबाबत भारतीय सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षा सचिव अजय कुमार यांनी रविवारी याबाबतची अधिक माहिती दिली.

हवाई दलामध्ये फायटर जेटची होती कमतरता
हवाई दलात लढाऊ विमानांची कमतरता असल्याने सरकारने लढाऊ विमानांची संख्या वाढवण्याची घोषणा केली आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, हवाई दलाला लवकरच 200 नवीन लढाऊ विमान मिळणार आहेत. ते म्हणाले की, लढाऊ विमानांच्या कमतरतेची पूर्तता करण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) बरोबर करार करण्यात आला आहे आणि तो शेवटच्या टप्प्यावर आहे. यासाठी एचएएल 83 लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस मार्क 1 बनवेल.

200 लढाऊ विमानांचे दिले कॉन्ट्रॅक्ट
सुरक्षा सचिव अजय कुमार म्हणाले की वायुसेनेच्या ताफ्यात 110 इतर विमानांचा समावेश करण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट जारी केले गेले आहे. त्या आधारे, प्रस्तावासाठी विनंती निर्माता कंपन्यांना पाठविली जाईल आणि पुढील कराराची प्रक्रिया सुरू होईल. ते म्हणाले की, सर्व विमानांची संख्या सुमारे 200 असेल जी येत्या काळात हवाई दलाला नियुक्त करण्यात येणार आहेत. विद्यमान आवश्‍यकता लक्षात घेऊन एचएएलशी या संबंधात चर्चा केली गेली आहे आणि कराराची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

1999 मध्ये निवृत्त झाले होते मिग-27
अजय कुमार यांनी सांगितले की, विमानांना लवकरात लवकर बनवण्यासाठी याच वर्षी करारावर हस्ताक्षर केली जाईल. आता लढाऊ विमानांचे डिझाईन फायनल केली जाईल मग त्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. यासाठी जरी आऊटसोर्सिंगची गरज भासली तरी घेणार असल्याचे सरंक्षण सचिवानी स्पष्ट केले. सध्या हवाई दलाकडे मिराज 2000, 30 सुखोई, मिग 29, जॅग्वार आणि मिग – 21 बाइसन अशी लढाऊ विमाने आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/