मला ‘टीम इंडिया’चं ‘कोच’ बनायला आवडेल, भारताच्या ‘या’ माजी कर्णधाराची ‘Wish’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक बदलण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला असून प्रशिक्षकपदासाठी अर्ज देखील मागवले होते. यासंबंधात चर्चांना आणि तर्क वितरकांना मोठ्या प्रमाणावर ऊत आला असून संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही यात उडी घेतली आहे. त्याने भारतीय संघाचं प्रशिक्षक बनायला आपल्याला निश्चितच आवडेल असे सांगितले आहे.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै ही होती. त्यानुसार संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी लालचंद राजपूत, माईक हेसन, गॅरी कस्टर्न, टॉम मूडी, रॉबिन सिंह यांनी अर्ज केले असून प्रविण आमरे यांनी फलंदाजी प्रशिक्षक तर क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासाठी आफ्रिकन खेळाडू जॉन्टी ऱ्होड्स यांनी अर्ज केले आहेत.

कोलकात्यात एका कार्यक्रमात गांगुली बोलत होता. त्यावेळी त्याने, ‘मला भारतीय संघाचा प्रशिक्षक बनायला एक दिवस नक्की आवडेल, पण ती वेळ आता आलेली नाही. आत्ता मी आयपीएल, पश्चिम बंगाल क्रिकेट संघटना, समालोचन अशा विविध कामांमध्ये व्यस्त असून ही सर्व काम पार पाडल्यानंतर मी एक दिवस प्रशिक्षकपदासाठी नक्कीच अर्ज करेन.” असे सांगत अजून थोड्या कालावधीनंतर प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत उतरणार असल्याचे संकेत देखील त्याने दिले.

याआधी भारतीय संघाच्या प्रशिक्षक निवडीसाठी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समिती नेमली होती. मात्र आता ती बरखास्त करण्यात आली असून महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी कपिल देव, अंशुमन गायकवाड यांची समिती स्थापन केली आहे. तिच्याद्वारे भारतीय संघाचा प्रशिक्षक निवडला जाणार जाईल. त्याजागी कोणाची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त