Deglur-Biloli By-Election | देवेंद्र फडणवीसांनी फोडला शिवसेनेचा नेता, ‘या’ मतदार संघातील पोट निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस आमदार (Congress MLA) रावसाहेब अंतापूरकर (Raosaheb Antapurkar) यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड जिल्ह्यातील (Nanded district) देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक (Deglur-Biloli By-Election) येत्या 30 ऑक्टोबरला होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली असून भाजपनेही (BJP) आपला उमेदवार जाहीर केला आहे. भाजपने देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीसाठी (Deglur-Biloli By-Election) शिवसेनेला (Shivsena) खिंडार पाडत सेनेचे नाराज नेते सुभाष साबणे (Subhash Sabne) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या मराठवाडा दौऱ्यावर आले आहे. या दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला असून माजी आमदाराला भाजपकडून उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे काही महिन्यापूर्वी निधन झाले असून या जागेवर पोटनिवडणूक (Deglur-Biloli By-Election) होत आहे. यासाठी भाजपने शिवसेनेच्या नाराज सुभाष साबणे यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली आहे.

लवकरच भाजप प्रवेश
शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नरसी नायगावमध्ये दाखल झाले होते.
देवेंद्र फडणवीस आणि सुभाष साबणे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे.
आता भाजपने त्यांच्या नावाची घोषणा केल्याने साबणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Web Title :- Deglur-Biloli By-Election | devendra fadnavis announces name of former shivsena leader as a bjp candidate of deglur biloli By-Election

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | खा. कोल्हेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचा टोला, म्हणाले – ‘कुणी स्वप्न पाहायला हरकत नाही’

Pune Crime | पुणे शहरात वाहन चोरी करणारे चारजण गुन्हे शाखेकडून गजाआड, रिक्षासह 6 दुचाकी जप्त

Pune Crime | उसने पैसे न दिल्याने कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न; पुण्याच्या ए. डी. कॅम्प चौकातील घटना