भद्रावतीच्या ग्रामीण रूग्णालयात मृत्युदेहाची विटंबना

भद्रावती , पोलीसनामा ऑनलाइन – भद्रावती येथील ग्रामीण रूग्णालयात असलेली शव शवशितपेटि अनेक दिवसांपासून ना दुरुस्त असल्याने मृतदेह खराब होत असुन उंदीरेसुध्दा कुरतडत असल्याने मृतदेहाची विटंबना होत असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आलेला आहे.

येथील ग्रामीण रूग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यापुर्वी ते चांगल्या अवस्थेत ठेवण्याकरिता विजेवर चालणारी शवशितपेटी आहे. माञ ति अनेक दिवसापासून नादुरुस्त आहे. त्यामुळे मृतदेह खराब होतो. व उंदीरेसुध्दा कुरतडतात हा प्रकार म्हणजे मृतदेहाची विटंबना करण्याचाच एक प्रकार आहे. हि समस्या लक्षात घेवुन येथील वंचित बहुजन आघाडी तर्फे ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी यांना दि.26 ऑक्टोबर रोजी एक निवेदन सादर करून सदर शवशितपेटी त्वरीत दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.सदर शवशितपेटी दुरुस्त करण्याकरिता वैद्यकिय अधिकार्यांनी शासनाकडे पाठ पुरावा केल्या नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदन सादर करताना वंचित बहुजन आघाडी चे नगरसेवक सुनिल खोब्रागडे, नगरसेवक सुशील देवगडे, नगरसेवक राहुल चौधरी, नगरसेविका सीमा ढेंगडे, नगरसेविका राखि रामटेके, कपुरदास दुपारे, संजय पाटिल, विजय पाटिल, ग्यानी चहांदे, राजु लभाने, विजय इंगोले, विशाल कांबळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.