Dehli Capitals Corona Virus Case | दिल्ली कॅपिटल्स संघातील फिजिओसह खेळाडूही कोरोना पॉझिटिव्ह!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आयपीएलच्या 15 मोसमाला सुरूवात होऊन आता कुठे स्पर्धा रंगतदार होत नाही तर पुन्हा एकदा कोरोनाचं विघ्न आलं आहे (Tata IPL 2022) . दिल्ली कॅपिटल्स (Dehli Capitals Corona Virus Case) संघातील फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांना आधी कोरोनाची (Corona) बाधा झाली होती. मात्र आता एक खेळाडू पॉझिटिव्ह आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्ससाठी (Dehli Capital Corona Virus Case) हा मोठा धक्का आहे.

ज्या खेळाडूला लागण झाली आहे त्यांचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. मात्र रॅपिड टेस्टमध्ये त्याची चाचणी पॉझिटिव्ह (Test positive) आली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पुढील सामना हा 20 एप्रिलला पंजाब किंग्जसोबत (Punjab Kings) होणार आहे. सोमवारी म्हणजेच आज दिल्लीचा (Dehli Capitals Corona Virus Case) संघ पुण्यासाठी (Pune) रवाना होणार होता मात्र आता संपुर्ण संघ हॉटेलमध्येच क्वारंटाईन झाला आहे.

सर्व खेळाडूंची कोरोनाची चाचणी घेतली जाणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने बीसीसीआयची डोकेदुखी वाढली आहे. दिल्ली कॅपिटल्स (Dehli Capitals) संघाने आता खेळलेल्या 5 सामन्यामध्ये त्यांना फक्त दोन सामने जिंकता आले आहेत.

दरम्यान, आज दिल्लीचा कोणता खेळाडू आला आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच बीसीसीआयचीसुद्धा (BCCI) कोंडी झाली असावी.

Web Title :- Dehli Capitals Corona Virus Case | ipl 2022 corona case in ipl delhi capitals squad is under isolation


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune School Bus Fares Increase | पुणेकरांना महागाईचा झटका ! स्कूल बसच्या भाड्यात प्रचंड वाढ

Nana Patole Criticize Raj Thackeray | ‘त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे’; नाना पटोलेंनी नाव न घेता केली राज ठाकरेंवर कारवाईची मागणी

Pune Crime | ‘जपानमधून 100 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करतो’ असे सांगून व्यापाऱ्याला 34 लाखांना गंडा

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होणार

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठा झटका ! मिळणार नाही 18 महिन्यांचा DA Arrears, मोदी सरकारचा नकार