उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, मुख्यमंत्र्यांसहसंपूर्ण सरकार होऊ शकतं क्वारंटाईन

देहरादून :  वृत्तसंस्था –  उत्तराखंडमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच एक मोठी बातमी आली आहे. शनिवारी कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांच्या पत्नी माजी आमदार अमृता राव यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आता स्वत: सतपाल महाराज यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. एवढेच नाही तर महाराज यांचा मुलगा, सुन यांच्यासह 22 कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा अहवाल येताच एकच खळबळ उडाली आहे. कारण शुक्रवारी सचिवालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सतपाल महराजही हजर होते आणि खुद्द मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावतही या बैठकला उपस्थित होते. यानंतर महाराज यांनी पर्यटन विभागाच्या बैठकांना देखील हजेरी लावली होती.

सतपाल महाराजांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता महाराजांच्या मंत्रिमंडळातील सहकार्यांसमवेत बैठकीला उपस्थित राहणाऱ्या लोकांना प्रोटकॉल नुसार क्वारंटाईन केले जाईल का असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जर प्रोटोकॉलचे 100 टक्के पालन केले तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी होणारे सरकार आणि सरकारमधील सर्व अधिकारी यांचे सॅम्पल्स घेतले जातील. जे कॅबिनेट पासून पर्यटन विभागाच्या बैठकिला उपस्थित होते. संपूर्ण सरकार भीतीच्या सावटाखाली आले असताना देशातील ही पहिली घटना आहे. महाराजांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच प्रशासनाची उच्चस्तरीय समितीची बैठक घेण्यात येत आहे.

पत्नी एम्समध्ये दाखल

शनिवारी कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांच्या पत्नी अमृता राव यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. रविवारी सकाळी अमृता राव यांना ऋषिकेश एम्समध्ये दाखल करण्यात आले. तसेच सतपाल महाराजांसह 24 जणांचे सॅम्पल्स घेतल्यानंतर त्या सर्वांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.