पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – Dehu Raod Police News | देहुरोड पोलिसांनी दोघा सराईत गुन्हेगारांना पकडून त्यांनी चोरलेल्या २१ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या वर्षभरात त्यांनी ७ पोलीस ठाण्याच्या परिसरातून या मोटारसायकली चोरल्या होत्या. (Vehicle Theft Detection)
आकाश शंकर जाधव (वय २४, रा. चिखली, मुळ गाव कोळसुर, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) आणि आशुतोष नानासाहेब घोडके (वय २३, रा. चिखली) अशी या चोरट्यांची नावे आहेत.
देहुरोड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला चोरीची दुचाकी घेऊन काही जण देहुरोड बाजार परिसरातील स्वामी चौकात येणार असल्याची माहिती मिळाली. त्याअनुंशषाने पोलिसांनी सापळा लावला. दोघे जण ज्युपीटर स्कुटरवरुन आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडील दुचाकी देहुरोड येथून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशीमध्ये त्यांनी अनेक मोटारसायकली चोरीची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी बीड जिल्ह्यातील नागझरी येथून १४ लाख ४५ हजार रुपयांच्या चोरीच्या २१ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
देहुरोड पोलीस ठाणे २, चिखली पोलीस ठाणे ७, भोसरी एमआयडीसी ३, निगडी पोलीस ठाणे ३, भोसरी पोलीस ठाणे २,
दिघी, चिंचवड व सिंहगड पोलीस ठाणे प्रत्येकी एक असे २१ गुन्हे उघडकीस आले आहेत.
दोघाही आरोपींना ५ सप्टेबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ़ शशिकांत महावरकर,
अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त देवीदास घेवारे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयकुमार वाकसे,
पोलीस उपनिरीक्षक सोहन धोत्रे, अजयकुमार राठोड, पोलीस अंमलदार बाळाासहेब विधाते, सुनिल यादव, प्रशांत माळी,
केतन कानगुडे, संतोष महाडिक, युवराज माने, शुभम बावनकर, कैलास उल्हारे, खंडु विरणक, मंगेश लोखंडे यांनी केली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा