हाॅटेल मालकाकडून ग्राहकाला चाॅपर, लोखंडी सळईने बेदम मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर अज्ञात व्यक्तीने ग्राहकाला कानाखाली मारल्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची विनंती केली म्हणून ग्राहकांना हॉटेल मालक आणि हॉटेलमधील वेटरने गंभीर मारहाण केली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रावेत येथील राजवाडा हॉटेल येथे घडली. पोलिसांनी हॉटेल मालकास अटक केली आहे.

विठ्ठल बलभीम सरेकर (31, रा. थेरगाव, चिंचवड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हॉटेल मालक विजय ढुमे याला अटक केली आहे. तर त्याच्या हॉटेलमधील पाच ते सहा वेटर विरोधात मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल त्यांच्या भाच्यासोबत चिंचवडमधील हॉटेल राजवाडा येथे रविवारी साडेसहाच्या सुमारास जेवण करण्यासाठी गेले. जेवण करत असताना एका अनोळखी व्यक्तीने विठ्ठल यांच्या भाच्याच्या कानाखाली मारली. याबाबत विठ्ठल यांनी हॉटेल मालक आणि कॅशियर यांच्याकडे विचारणा केली.

तसेच हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज दाखवून कानाखाली मारणा-याची ओळख पाठवावी, अशी विनंती केली. त्यावेळी हॉटेल मालक विजय ढुमे आणि त्याच्या पाच ते सहा वेटरने मिळून विठ्ठल यांच्यावर चॉपरने वार केले. तसेच दोघांना काठीने, लोखंडी सळइने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. देहूरोड पोलिसानी ढूमे याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास देहूरोड पोलिस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

पुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी

ई-फार्मसीसाठी ई-प्रिस्क्रिप्शनची गरज

Loading...
You might also like