रावण टोळीच्या दोन सदस्यांकडून दोन कट्टे जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – रावण टोळीच्या दोन सदस्यांना देहूरोड पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक केलेल्या दोघांवर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

हितेश ऊर्फ नाना सुनील काळे (25, रा. किन्हईगाव, ता. हवेली) आणि प्रसन्ना उर्फ़ सोनू पवार (रा. मावळ) या दोघांना अटक केली आहे.
Dehuroad Police Station

अमरजाई मंदिर देहूरोड येथे एकजण गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिस कमर्चारी किशोर परदेशी यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुस आढळून आले.

पोलीस कॉन्स्टेबल संकेत घारे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किन्हईगावात एक तरुण पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती देहूरोड पोलिसांना मिळाली त्यानुसार परिसरात सापळा रचून हितेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे असा एकूण 20 हजार 800 रुपयांचा ऐवज आढळून आला.

या दोन्ही कामगिरी उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मनीष कल्याणकर, सहाय्यक निरीक्षक शाहिद पठाण, उपनिरीक्षक अशोक जगताप, किरण कणसे, गणेश गायकवाड, कमर्चारी सुभास सावंत, सात्रस, प्रमोद उगले, राजू कुरणे, अनिल जगताप, किशोर परदेशी, सचिन शेजाळ, संकेत घारे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

Visit : policenama.com