देहूरोड परिसरात वाहनांची तोडफोडीच सत्र सुरूच..

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

देहूरोड परिसरात सध्या भीतीचे वातावरण असून रात्री बाहेर निघणे कठीण झाले आहे.मे च्या पहिल्या आठवड्यात काही समाजकंटकांनी दोन महिलांना मारहाण करत सहा गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली होती.या घटनेला काही दिवस होत नाहीत की,आंबेडकर रोड आणि देहूरोड बाजार पेठेत पार्किंग केलेल्या दोन चारचाकी वाहनाची अज्ञात इसमानी धारदार शस्त्राने तोडफोड केली आहे.संशयित परिसरातील सिसिटीव्हीत कैद झाले आहेत.अद्याप मात्र देहूरोड पोलिसात गुन्हा दाखल नाही.

मिळालेल्या माहितीनुसार,मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही समाजकंटकांनी सहा वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असताना अज्ञात इसमानी बाजापेठेतील आणि आंबेडकर रोड वरील एक-एक वाहनाची तोडफोड केली आहे.संशयित हातात धारदार शस्त्र घेऊन दुचाकीवर आणि चालत वावरत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.रवी खन्ना आणि जावेद शेख अस वाहन मालकांची नावे आहेत.ज्यावेळी रवी खन्ना यांच्या गाडीची तोडफोड झाले त्यावेळी रवी हे त्याचं गाडीत होते अशी माहिती मिळत आहे.नशीब बलवत्तर म्हणून अज्ञातांनी त्यांना इजा पोहचवली नाही.अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही,त्यामुळे या घटने विषयी देहूरोड पोलीस गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे.