..म्हणून पोलीस ठाण्यातच आरोपीचा ‘राडा’ ; पोलीसांच्या अंगावर धावून जात ‘शिवीगाळ’

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पूर्वीच्या वादातुन भांडण झाल्याने पोलिस चौकीत आलेल्याकडे चौकशी करत असताना त्याने पोलिस चौकीतच राडा घातला आणि पोलिसांच्या अंगावर धावून गेला. हा प्रकार रविवारी (दि.2) रात्री अकराच्या सुमारास देहूरोड पोलीस ठाण्यात घडला.

याप्रकरणी पोलीस कर्मचारी सुमित मारुती मोरे यांनी फिर्याद दिली आहे. तर नागेश प्रकाश रेड्डी (25, रा. पारशी चाळ, देहूरोड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड येथील नबी अब्दुल शेख यांनी नागेश याच्याविरोधात मागील काही दिवसांपूर्वी गुन्हा नोंदवला. हा गुन्हा मागे घेण्यासाठी नागेश याने नबी यांच्या घरात घुसुन दमदाटी केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी नागेश याला देहूरोड पोलीस ठाण्यात आणले. देहूरोड पोलीस त्याची चौकशी करत असताना नागेश याने पोलिसांबद्दल अपशब्द बोलून त्यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली. तसेच मोठमोठ्याने आरडाओरडा केला. तपास देहूरोड पोलिस करत आहेत.

Loading...
You might also like