देहूरोड : लोकलच्या धडकेत अनोळखी युवकाचा मृत्यू

देहूरोड : पोलीसनामा ऑनलाईन

लोहमार्ग ओलांडत असताना पुणे-लोणावळा लोकलची धडक बसल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. मृत युवकाची ओळख अद्याप पटली नसल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. ही घटना बुधवारी (दि.१८) रात्री पावणे नऊच्या सुमारास देहूरोड रेल्वे स्थानकाजवळ घडली.

रेल्वे पोलीस पुरुषोत्तम कर्दळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा रेल्वे स्थानकावरून रात्री 8. 40 वाजता निघणारी लोणावळा-पुणे लोकल (99827) नऊच्या सुमारास देहूरोड रेल्वे स्थानकाजवळ आली. त्यावेळी अज्ञात युवक रेल्वे रूळ ओलांडत होता. त्याला धावत्या लोकलची धडक बसून तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a628dd1c-8b3a-11e8-a134-711ec9d223b0′]

लोकलच्या धडकेत मृत्यू झालेल्या युवकाचे वय अंदाजे 35 वर्ष आहे. उंची 5.2 फूट आहे. राखाडी रंगाचा फूल शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे.