देहूरोड : रेल्वेच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

देहूरोड : पोलीसनामा ऑनलाईन

लोहमार्ग ओलांडत असताना रेल्वेची धडक बसून तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.९) रात्री एकच्या सुमारास बेगडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ घडली. या तरुणीची ओळख अद्याप पटली नसून लोहमार्ग पोलीसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
[amazon_link asins=’B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7d878d6c-835e-11e8-9689-b18364eb558c’]

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री एकच्या सुमारास लोहमार्ग ओलांडत असताना एका तरुणीचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. या तरुणीचे वय अंदाजे पंचवीस वर्षे असून वर्ण गव्हाळ, उंची पाच फूट दोन इंच आहे. तिने अंगामध्ये गुलाबी रंगाचा स्वेटर, निळा टॉप त्यावर फुलपाखरांचे चित्र आणि लाल रंगाची पँट असा वेश परिधान केला आहे. तरुणीजवळ कोणतेही सामान आढळून न आल्याने तिची ओळख पटली नसल्याचे लोहमार्ग पोलीस पुरुषोत्तम कर्दाळे यांनी सांगितले. या तरूणीबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी देहूरोड रेल्वे पोलीस चौकीशी मध्ये संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.