Coronavirus : दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत 6 जणांचा मृत्यू, 438 नवे रुग्ण

नवी दिल्ली – जगभरात कोरोना विषाणूविरुद्धचा लढा तीव्र होत असतानाच त्याच्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. देशाची राजधानीही याला अपवाद नाही. दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाविषाणूची बाधा झालेल्या 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 438 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. ही नवी संख्या जमेस धरता दिल्लीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 9333 इतकी झाली आहे. दिलासादायक बातमी म्हणजे गेल्या 24 तासांत 408 जण बरे झाले आहेत किंवा त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे किंवा त्यांन दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आले आहे. सध्या उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5278 आहे, अशी माहिती दिल्लीच्या आरोग्य विभागाने दिली आहे. दिल्ली शहरातील रुग्णांची संख्या पहिल्यांदा नियंत्रणात होत पण तब्लिगी मरकजप्रकरणानंतर या रुग्णांच्या संख्येत अचानक मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभाग कसोशीने काम करत आहे.