पोलीस अधिकार्‍याच्या कारनं महिलेला चिरडलं, अंगावर शहरे आणणारा अपघात, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीत अनलॉक 2 च्या टप्प्यात अंगावर शहारे आणणारा अपघात समोर आला आहे. या अपघाताची थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या कारनं रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून कारच्या धडकेत ही महिला काही अंतरावर फेकली गेली. हा अपघात 3 जुलै रोजी चिल्ला गावाजवळ घडल्याची माहिती मिळत आहे.

देशभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आले होते. लॉकडाऊन नंतर अनलॉक 1 सुरु करण्यात आले. अनलॉक 1 नंतर सध्या अनलॉक 2 सुरु असून या टप्प्यात झालेल्या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या कारनं महिलेला चिरडल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे एका चिंचोळ्या रस्त्यावर मागून येणाऱ्या कारनं रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या महिलेला जोरात धडक दिली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत कार चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार चालकाने घटनास्थळी न थांबता कारचा स्पीड वाढवून महिलेच्या अंगावरून कार चालवत तसाच पुढे निघून गेला.

नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या द्वारे कारचा नंबर शोधून कार चालकाचा शोध घेतला. पोलिसांनी कार चालकाचा शोध घेतला त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. कार चालवणारा व्यक्ती पोलीस उप निरीक्षक असून घटनेच्यावेळी तो दारूच्या नशेत होता. हा पोलीस अधिकारी दारूच्या नशेत गाडी चालवत होता. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like