AAP आमदार अब्दुल रहमान यांच्याविरूद्ध FIR दाखल, छेडछाड आणि मारहाणीचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माहितीनुसार आम आदमी पार्टीचे आमदार अब्दुल रहमान यांच्याविरूद्ध जाफराबाद पोलीस ठाण्यात रविवारी रात्री एफआयआर नोंदला गेला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. महिलेने आरोप केला की, आमदार अब्दुल रहमान यांनी तिच्यासोबत छेडछाड आणि विरोध केल्यानंतर मारहाण सुद्धा केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पार्टीचे आमदार अब्दुल रहमान रविवारी जाफराबाद परिसरात पालिका पोटनिवडणुकीच्या वेळी उपस्थित होते. तेव्हा त्यांचा एका महिलेसोबत वाद झाला होता. त्याच महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सध्या, पोलीस महिलेने केलेल्या आरोपांचा तपास करत आहेत. अब्दुल रहमान दिल्लीच्या सीलमपुर विधानसभा मतदार संघातून आम आदमी पार्टीचे आमदार आहेत.