तुरूंगातून पळून आला होता पती, पत्नीबरोबर केलं ‘भांडण’ अन् पोहोचला ‘तिहार’मध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आपल्या पत्नीशी भांडण एका पुरुषाला महागात पडले. ज्या व्यक्तीला पोलिस आठ महिन्यांपासून शोधत होते त्यास त्याच्या पत्नीने एका क्षणात पुन्हा तिहार जेलची हवा खायला लावली. ही घटना देशाची राजधानी दिल्लीमध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम नगर पोलिस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका महिलेने पोलिस कंट्रोल रूमला माहिती दिली की तिचा नवरा तिच्याशी भांडत आहे आणि तिच्यावर अत्याचार करत आहे. पोलिस तिथे पोहोचले तेव्हा महिलेने पतीचं भांडं फोडलं आणि सांगितलं की माझ्या पतीवर खुनाचा आरोप असून तो बेल वर बाहेर येऊन फरार झाला आहे. विनोद कुमार असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो दिल्लीच्या महाराणी इन्क्लेवमध्ये उत्तम नगर येथे राहत होता. विनोदच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की तिचा नवरा तिला मारहाण करतो आणि जुन्या प्रकरणात तो दोषीही आहे.

उत्तम नगर पोलिस ठाण्याच्या पथकाने विनोदची चौकशी केली असता हे समजले की तो ७ वर्षांच्या जुन्या हत्येप्रकरणी आरोपी आहे आणि कोर्टाने त्याला २०१७ मध्ये १० वर्षांची शिक्षा देखील सुनावली होती. तेव्हापासून तो मंडोली जेलमध्ये होता परंतु यावर्षी एप्रिलमध्ये तो १ महिन्यासाठी पॅरोलवर बाहेर आला आणि त्यानंतर तो परत तुरूंगात गेलाच नाही.

आरोपी विनयची चौकशी केली असता त्याने सांगितले की ७ वर्षांपूर्वी विजयविहार परिसरातील एका मित्राबरोबर गाडीने जात असताना त्याची कार एका ऑटोला टच झाली. त्यानंतर त्याने ऑटो चालकाशी भांडण सुरू केले आणि ही बाब इतकी वाढली की विनोद आणि त्याच्या एका मित्राने ऑटो चालकास बेदम मारहाण केली आणि दगडाने ऑटो चालकावर वार करून तेथून पळ काढला.

त्या प्रकरणात ऑटो चालक ठार झाला. पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३०२ अन्वये विनोदला अटक केली होती. नंतर कोर्टाने त्याला दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like