आता दिल्‍ली विमानतळावर ‘बोर्डिंग पास’ नव्हे तर ‘चेहरा’ पाहून मिळणार ‘एन्ट्री’, आजपासून सुरूवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. यापुढे तुम्हाला विमान प्रवास करताना ओळखपत्र जवळ बाळगण्याची गरज नाही. यापुढे तुमची ओळख हि तुमच्या चेहऱ्याने केली जाणार आहे. विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी यापुढे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-3 वर बायोमॅट्रिक फेशियल रिकॉग्निशन सिस्टमची ट्रायल सुरु करण्यात आली आहे.

सध्या विस्तारा एअरलाइंसबरोबर मिळून यावर काम करण्यात येणार आहे. पुढील तीन महिन्यांसाठी हि ट्रायल योजना सुरु करण्यात आली असून हि योजना सफल झाल्यास टर्मिनल-3 वरील सर्व नागरिकांसाठी हि सुविधा सुरु करण्यात येणार आहे.

पोर्तुगालच्या कंपनीबरोबर करार
हि बायोमेट्रिक एनेबल्ड सीमलेस ट्रॅव्हल एक्सपीरियंस च्या अंतर्गत दिल्ली विमानतळावर आधुनिक मशिन्स लावली जाणार आहेत, जी प्रवाशांचा चेहरा आणि त्यांच्या बायोमेट्रिक माहितीवरून त्यांची ओळख पाठवणार आहेत. यामुळे विमानतळावर चौकशी करण्यासाठी सोपे होणार आहे. हि सुविधा पूर्णपणे ऍटोमॅटिक पद्धतीने काम करणार असून प्रवाशांचा चेहराच त्यांचे प्रवेश पत्र तसेच बोर्डिंग पास आणि ओळखपत्र असणार आहेत.

दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या प्रवक्त्यांनी सांगितले कि, यामुळे वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. त्याचबरोबर या सुविधेत नोंदणी करण्यासाठी प्रवाशांची परवानगी घेतली जाणार आहे. याआधी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर देखील अशाच प्रकारे जुलै महिन्यात याची चाचणी घेण्यात आली होती.

आरोग्यविषयक वृत्त –