दिल्ली विधानसभा : केजरीवालांच्या ‘समर्थनार्थ’ पुढे आला ‘चहावाला’, ‘आप’नं केलं स्टॉलचं ‘ओपनिंग’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – आम आदमी पक्षाने गुरुवारी कामाचा चहाचे लॉंचिंग केले. ज्यामध्ये केजरीवाल सरकारच्या कामावर प्रभावित होऊन एमबीए चहावाल्याने आपच्या मुख्यलयात चहाचा स्टॉल सुरु केला. मूळचा अहमदाबादचा, प्रफुल्ल बिल्लौर एमबीए चायवाला म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी स्वत: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे जाऊन आम आदमी पार्टीच्या सरकारच्या कामांची चहाच्या दुकानात जाहिरात करण्याची इच्छा व्यक्त केली. पक्षाचे दिल्ली निवडणूक प्रभारी आणि राज्यसभा सदस्य संजय सिंग यांच्या हस्ते एमबीए चहा स्टॉलचे उद्घाटन झाले.

या स्टॉलमध्ये आम आदमी पक्षाने केलेल्या कामांच्या माहितीचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. या कामांचे वर्गीकरण चार प्रकारच्या चहामध्ये करण्यात आले आहे. प्रफुल्ल यांनी सांगितले की, ते चार वर्षांपासून या व्यवसायात आहेत. त्यांना पहिल्यांदा अहमदाबाद येथे असताना अरविंद केजरीवाल यांच्याबाबत समजले. सोशल मीडियावरून त्यांना याबाबतची माहिती मिळाली.

त्यानंतर त्यांनी केजरीवालांना भेटण्यासाठी अनेकदा संपर्क केला मात्र त्यांना यश आले नाही जसे दिल्ली विधानसभेची घोषणा झाली त्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षाच्या काही नेत्यांशी संपर्क साधला आणि त्यांना पक्षाच्या कार्यालयात स्थान मिळाले. केजरीवाल सरकारने खूप हॅन्गल्या पद्धतीने काम केले आहे म्हणून प्रफुल्ल यांनी चार प्रकारच्या चहाला त्यांच्या कामकाजाची नावे दिली आहेत.

शिक्षणाचा चहा, यामध्ये केजरीवाल यांच्या सरकारने शिक्षण व्यवस्थेसाठी जी चांगली कामे केली आहेत त्याची माहिती दिली आहे. दुसरा आहे आरोग्याचा चहा, केजरीवाल सरकारने सर्व रुग्णालयांची व्यवस्था चांगली केली म्हणून हे याने देण्यात आले आहे.

तिसरा आहे स्पेशल चहा, यामध्ये आप सरकारने रोजच्या सर्वसामान्य गोष्टींमध्ये केलेल्या बदलाचा समावेश आहे. ज्यामध्ये वीज बिल, महिला सुरक्षा, प्रवास अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. चवथा आहे विकासाचा चहा यामध्ये एकूणच केजरीवाल सरकरचा कार्यकाळ सांगण्यात आला आहे.

केजरीवालांनी केलेली कामे जमिनीवर दिसत आहेत म्हणून हे सर्व करत असल्याचे प्रफुल्ल यांनी सांगितले आणि या स्टॉलच्या शाखा अजून वाढणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. प्रफुल्ल हे लोकांना फ्रीमध्ये चहा वाटतात आणि अनेक सामाजिक कार्यामध्ये देखील सहभागी होतात.

फेसबुक पेज लाईक करा –