दिल्ली विधानसभा ‘काबीज’ करण्यासाठी भाजपाच्या 100 नेत्यांकडून 5000 सभा, PM मोदींच्या 10 सभेसाठी ‘आग्रह’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात विजय मिळवत असताना राजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकीत यश मिळविता येत नसल्याची खंत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना सलत आहे. त्यामुळे या वेळी काहीही करुन दिल्ली काबिज करण्याचा निर्धार भाजपाने केला आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षाने आपल्या 100 नेत्यांना कामाला लावले असून छोट्या छोट्या अशा 5 हजार सभा घेण्याची तयारी केली आहे. प्रचारादरम्यान प्रत्येक दिवशी 250 गल्ली-मोहल्यात या सभा घेतल्या जाणार आहेत.

इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीमध्ये 10 सभा घेण्याचा आग्रह केला आहे. भाजपाने आतापर्यंत 70 पैकी 57 जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like