दिल्ली विधानसभा : ‘आप’नं दिलं 8 महिलांना तिकीट, 9 जागांवर नवीन चेहरे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आम आदमी पक्षाच्या पॉलिटीकल अफेअर्स कमिटीची बैठक मंगळवारी पार पडली. यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या सर्वच 70 जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली गेली. यानुसार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया हे पतपरगंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. पक्षाने जाहीर केलेल्या यादीत एक खास गोष्ट दिसत आहे. गेल्या वेळच्या म्हणजेच 2015 सालच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 6 महिला उमेदावारांना संधी दिली होती. तर यावेळी मात्र पक्षाने 8 महिलांना संधी दिली आहे.

6 महिलांऐवजी 8 महिलांना तिकीट
माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया म्हणाले, “बैठकीत 46 विद्यमान आमदारांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. यातील 9 जागांवर नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यावेळी 6 महिलांऐवजी 8 महिलांना संधी देण्यात आली आहे. एकूण 70 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात मंगोलपुरी मतदारसंघातून राखी बिर्लान, शालीमार बाग येथून वंदना कुमारी, कालकाजीमधून आतिशी, आर. के. पुरममधून प्रमिला टोकस, राजौरी गार्डनमधून धनवंती चंदेला, हरिनगरमधून राजकुमारी ढील्लाे, पालममधून भावना गौर, रोहतास नगरमधून सरिता सिंह आदी नावांचा समावेश आहे. 15 विद्यमान आमदारांना रिप्लेस करण्यात आलं आहे. 46 विद्यमान आमदार आहेत, 15 विद्यमान आमदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे. याशिवाय 9 रिक्त जागांवर नवीन चेहरे देण्यात आले आहेत.”

8 फेब्रुवारी रोजी निवडणूक तर 11 तारखेला निकाल
निवडणूक आयोगाने 6 जानेवारी रोजी दिल्लीतील निवडणूक भवनातून दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा केली होती. आयोगाने सांगितलं होतं की, 70 जागा असणाऱ्या दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. 11 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निडणुकीची तारीख जाहीर करताच दिल्लीत तात्काळ आचारसंहिता लागू करण्यात आली.

फेसबुक पेज लाईक करा –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like