केजरीवालांचा ‘पराजय’ अटळ, जर भाजपा हारली तर कधीच निवडणूक लढवणार नाही, ‘या’ दिग्गजानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले असून निवडणुकीचा निकाल लवकरच लागणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. ही निवडणूक भाजप विरुद्ध आप या दोन पक्षामध्येच रंगली असून या दिल्लीची सत्ता कोण काबीज करणार याकडे लक्ष लागून राहीले आहे. मतदान झाल्यानंतर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा आम आदमी पर्टी सत्ता स्थापन करणार असल्याचे एक्झीट पोलने सांगितले आहे.

दिल्लीच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने सुनील यादव यांना उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. मतदानानंतर आलेल्या एक्झीट पोलनंतर आपची सुनामी दिसून येत आहे. पुन्हा एकदा आप विरोधी पक्षांना मात देऊन सत्ता स्थापन करणार असे एक्झीट पोलच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून पराभव करू असा दावा दावा भाजपचे उमेदवार सुनील यादव यांनी केला आहे.

दोन हिंदी न्यूज चॅनलने केलेल्या सर्वेक्षणानुसार आणि त्यांच्या एक्झीट पोल नुसार दिल्लीमध्ये पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांचे सरकार स्थापन होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पर्टीला स्पष्ट बहुमत मिळू शकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजपला केवळ 2 ते 11 जागांवर विजय मिळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार दिल्लीत स्थापन होताना दिसून येत आहे.

एक्झिट पोलच्या दाव्यांना नकारत अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात उभे असलेले भाजपचे उमेदवार सुनील यादव यांनी भाजपच या निवडणुकीत विजयी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. सुनील यादव यांनी ट्वीट करून भाजप विजयी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. सुनील यादव यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा आणि संघटनेने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याबद्दल त्यांचे आभार. केजरीवाल निवडणूक हरवतील आणि नवी दिल्लीत भाजपचा विजय निश्चित आहे. जर असे झाले नाही तर मी कधीही निवडणुका लढणार नाही. केवळ आयुष्यभर पक्षासाठी काम करेल, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.