आता केजरीवाल ‘रिजेक्टेड’ लोकांना घेतात, काँग्रेसची खरमरीत टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमधील नेत्यांनी आता पक्ष बदलण्यास सुरुवात केली आहे. कॉंग्रेसचे माजी खासदार महाबल मिश्रा यांचा मुलगा विनय मिश्रा यांच्यासह तीन नेते सोमवारी आम आदमी पार्टी (आप) मध्ये दाखल झाले आहेत. विनय मिश्रा यांच्यासह तीन नेते ‘आप’ मध्ये गेल्यानंतर कॉंग्रेसने अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले आहे. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे म्हणणे आहे की, पार्टीने ज्यांना तिकीट देण्यास नकार दिला आहे अशांना केजरीवाल आपल्या पार्टीत शामिल करत आहेत. आप जवळ एकूण ७० उमेदवार नाही आहेत.

काँग्रेसचे नेते मुकेश शर्मा यांनी सांगितले की, आम आदमी पार्टी ची स्थिती खूप खराब आहे त्यामुळे काँग्रेसचा रिजेक्टेड माल आता केजरीवाल घेत आहेत. आम्हाला ७० जागांसाठी ६०० पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आले आहेत. केजरीवालांचा अहंकार त्यांना सत्तेपासून वंचित ठेऊ शकतो. आमच्यासोबतही असेच झाले होते. कॉंग्रेस पक्षाकडून पालम विधानसभेवर निवडणूक लढविणारे युवा नेते विनय कुमार मिश्रा आज आम आदमी पक्षात सामील झाले आहेत. पक्षाची धोरणे आणि आमच्या सरकारच्या कामांमुळे प्रभावित होऊन ते आमच्या कुटुंबात सामील होत आहेत. आम आदमी पार्टीमध्ये त्यांचे हार्दिक स्वागत आहे. असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

दिल्ली काँग्रेसला मोठा झटका
वास्तविक पाहता दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला राजधानी दिल्लीत मोठा धक्का बसला आहे. माजी खासदार महाबळ मिश्रा यांचा मुलगा विनय मिश्रा आम आदमी पार्टी (आप) मध्ये दाखल झाले आहेत. विनय मिश्रा यांनी २०१३ च्या निवडणुकीत पालम विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्याचा चांगलाच पराभव झाला होता आणि त्यांची जमानत देखील जप्त झाली होती. महाबल मिश्रा यांच्या मुलाव्यतिरिक्त बदरपूर चे माजी आमदार राम सिंग, जय भगवान आणि दिपू चौधरी देखील आज आम आदमी पार्टीत दाखल झाले आहेत.

दिल्लीत हेराफेरीचे राजकारण सुरू
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच सर्व पक्षांमध्ये तिकीट वाटपावरून हेराफेरीचे राजकारण सुरु झाले आहे. काँग्रेस आपले गमावलेले जनमत परत मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे.अशा परिस्थितीत कॉंग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या मुला-मुलींना त्यांचे वडील आणि कौटुंबिक राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी विधानसभा निवडणुकीत नशीब अजमावण्याची इच्छा असते. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत कॉंग्रेस आणि आप यांच्यात युद्ध आणखी तीव्र होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like