दिल्ली निवडणूक : ‘आप’च्या मनीष सिसोदियांकडे ‘कार’ही नाही, मात्र पत्नी ‘मालामाल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल की दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे जेष्ठ नेते मनीष सिसोदिया यांच्याकडे स्वतःची कार नाही. आणि त्यांची मालमत्ता देखील 2015 एवढीच आहे. म्हणजेच गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांच्या संपत्तीत म्हणावी अशी वाढ झालेली नाही. आपला विधासभेच्या उमेदवारीचा अर्ज भरताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

सिसोदिया यांनी भरलेल्या माहितीनुसार त्यांच्या पत्नीच्या नावे 65 लाख रुपयांची संपत्तीची आहे. 2015 मध्ये त्यांनी आपल्या नावे एक मारुती सुजूकी कार असल्याचे सांगितले होते. मात्र 2020 मध्ये त्यानीही एकही कार नसल्याचे म्हंटले आहे.

एवढी आहे सिसोदियांची संपत्ती
गुरुवारी देण्यात आलेल्या एफिडेविटमध्ये त्यांनी साल 2018-19 या कालावधीत स्वतःकडे 4,74,888 रुपयांची जंगम मालमत्ता असल्याची माहिती दिली आहे. तर 2013 ते 2014 या काळात त्याच्याकडे 4,92,624 रुपयांची जंगम मालमत्ता होती. 2015 मध्ये सिसोदिया यांनी गाझियाबादच्या वसुंधरा भागात 5 लाख 7 हजारांची मालमत्ता खरेदी केल्याची माहिती दिली होती. तिची 2015 मध्ये बाजारात किंमत 12 लाखांच्या जवळपास होती. यंदा दाखल झालेल्या एफिडेविटमध्ये त्यांनी या मालमत्तेची माहिती दिली आहे. या मालमत्तेची सध्याची किंमत 21 लाखांपर्यंत गेली आहे.

पत्नीची किती आहे संपत्ती
सिसोदिया यांनी 2015 मध्ये माहिती दिली होती की, त्यांच्या पत्नीने 2008 च्या मार्च महिन्यांमध्ये 8 लाख 70 हजार रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली होती. ज्याची बाजारात किंमत जवळजवळ 20 लाख एवढी होती. याव्यतिरिक्त त्यांच्या पत्नीच्या नावे 2018 च्या जुलैमध्ये मयूर विहार फेज 1 च्या परिसरात 65 लाखांची प्रॉपर्टी खरेदी केल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like