काय सांगता ! होय, दिल्ली विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या 70 पैकी तब्बल ‘इतक्या’ उमेदवारांचं ‘डिपॉझिट’ जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणूकीत ‘आप’ला मोठा विजय मिळाला. या निवडणूक ऐतिहासिक विजय मिळवून ‘आप’ पहिल्या क्रमांकाचा पक्षा राहिला तर मोठा पराभव स्विकारत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला. मात्र काँग्रेसला भोपळा देखील फोडता आला नाही. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील 70 जागा लढणाऱ्या काँग्रेसच्या 67 उमेदवारांचे निवडणूकीचे डिपॉजिटच जप्त झाले आहे. काँग्रेसचे फक्त 3 उमेदवार असे आहेत जे त्यांचे डिपॉजिट वाचवू शकले. ज्यात बादली मतदारसंघातील देवेंद्र यादव, कस्तुरबा नगर मतदारसंघातील अभिषेक दत्त आणि गांधी नगर मतदारसंघातील अरविंदर सिंह लवली यांचे समावेश आहे.

2015 साली देखील दिल्ली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदर्शन अत्यंत खराब राहिले होते. निवडणूकीत काँग्रेसला शून्यावर समाधान मानावे लागले. तेव्हा आपला 67 जागांवर मोठा विजय मिळाला होता, तर भाजपला फक्त 3 जागांवर समाधान मानावे लागले होते.

पक्षाच्या पराभवावर शर्मिष्ठा मुखर्जी यांनी केले प्रश्न उपस्थित –
काँग्रेसच्या मोठ्या पराभवानंतर पक्षातील अंतर्गत कलह समोर आला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मुलीने म्हणजेच शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विट करत दिल्लीत पक्षाच्या पराभवावर प्रश्न उपस्थित केले. शर्मिष्ठा यांनी पक्ष नेतृत्वाला आणि राज्य स्तरावरील एकतेतील कमतरतेला जबाबादार धरले.

खूप झाले आत्मपरिक्षण आता अ‍ॅक्शनमध्ये येण्याची वेळ –
काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा यांनी ट्विट केले की आपण दिल्लीत पुन्हा एकदा नाश केला. आत्मपरिक्षण खूप झाले आता अ‍ॅक्शनमध्ये येण्याची वेळ आली आहे. वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यास उशीर होत असल्याने आणि राजनीतिमध्ये कमी आल्याने राज्य स्तरावर एकतेतील कमी, निरुस्ताही कार्यकर्तेसह जमीनीवर कनेक्टिव्हिटी नसणे, हे सर्व मुद्दे पराभवाचे कारण ठरले.

शर्मिष्ठा मुखर्जी यांनी दुसरे एक ट्विट केले त्यात ते म्हणाले की भाजप विभाजन करण्याची राजकारण करते, केजरीवाल स्मार्ट राजकारण खेळत आहेत आणि आपण काय करत आहोत. आपण प्रमाणिकपणे म्हणू शकतो का की आपण योग्य पद्धतीने काम केले. आपण काँग्रेसवर हक्का दाखवण्यात व्यस्त आहोत. जर आपल्याला आणखी उभारुन पुढे याचचे असेल तर सुरक्षित जागाहून बाहेर पडून काम केले पाहिजे.