दिल्ली विधानसभा : मुख्यमंत्री केजरीवालांच्या संपत्तीत 5 वर्षात ‘इतकी’ झाली वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली निवडणूकीसाठी उमेवादारांकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. या अर्जात देण्यात आलेल्या माहिती नुसार केजरीवाल यांच्याकडे एकूण 3.4 कोटी रुपयांची संपत्ती असून मागील पाच वर्षात ही 1.3 कोटींनी म्हणजे 50 टक्क्यांनी वाढली.

अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी दुपारी 12.10 च्या सुमारास आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला. गर्दीमुळे अर्ज भरण्यासाठी त्यांना तब्बल 7 तास लागले. केजरीवाल यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार गेल्या पाच वर्षात संपत्तीत 50 टक्क्यांनी वाढ झाली.

2015 साली त्यांच्याकडे एकूण संपत्ती 2.1 कोटी रुपयांची होती. केजरीवाल यांची पत्नी सुनिता केजरीवाल यांच्याकडे 2015 साली रोकड आणि कायमस्वरुपीच्या ठेवी म्हणून एकूण 15 लाख रुपयांची रक्कम होती. 2020 मध्ये ती वाढून 57 लाख रुपये झाली. पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की व्हीआरएसनंतर सुनीता केजरीवाल यांनी 32 लाख रुपये आणि एफडी मिळाली. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडे 2015 मध्ये रोकड आणि एफडी मिळून 2.26 लाख रुपये होते ते 2020 मध्ये 9.65 लाख झाले.

केजरीवाल यांची स्थावर मालमत्ता 9 लाखवरुन वाढून 177 लाख झाली. मालमत्तेचे भाव वाढल्याने हे भाव वाढले असे पक्षाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

केजरीवाल यांचे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यातच दोन दिवस वाया गेले होते. सोमवारी आपल्याच रोड शो मध्ये अडकल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ते वेळेत पोहचू शकले नाहीत. मंगळवारी अर्ज दाखल करणाच्या शेवटच्या दिवशी असंख्य अपक्ष उमेदवारांमुळे तब्बल सहा तास प्रतिक्षा करावी लागली. केजरीवाल यांचा वेळ वाया घालविण्याचा कट भाजपने रचल्याचा आरोप सत्ताधारी आम आदमी पक्षाने केला.

फेसबुक पेज लाईक करा –