‘या’ महत्वाच्या 10 कारणांमुळं दिल्ली विधानसभेत भाजपाचा पराभव, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या निवडणूकीच्या निकालावरुन हे स्पष्ट झाले की भाजपची राजनीति चूकीची ठरली. भाजपने मोठी ताकदपणाला लावली होती. अनेक राज्यांतील मंत्री, 200 पेक्षा जास्त खासदार, केंद्रीय मंत्री यांची फौज प्रचारासाठी उतरवली होती. खुद्द जेपी नड्डा, अमित शाह, नरेंद्र मोदी यांनी अनेक सभा घेतल्या, परंतु दिल्लीच्या जनतेने भाजपला नाकारत केजरीवाल यांना पुन्हा एकदा संधी दिली.

1. जनतेची नस ओळखू शकला नाही भाजप –
दिल्लीच्या निवडणूकीत जनतेची नस भाजपला ओळखता आली नाही. पक्षाने त्या मुद्द्यावर प्रचार केला नाही ज्यावर दिल्लीतील मतदारांनी मतदान केले.

2. केजरीवाल यांच्या विरोधात चेहरा नाही –
केजरीवाल यांच्या विरोधात भाजप आपला चेहरा देऊ शकले नाही. 2015 साली किरण बेदी यांच्या मोठ्या पराभवानंतर भाजप आता नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढू इच्छित होती. परंतु केजरीवाल यांनी मोदींना प्रश्न विचारला की तुम्ही दिल्लीचे मुख्यमंत्री होणार ? परंतु निवडणूक मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूकीत यश ओढून आणण्याचा भाजपचा डाव फसला.

3. स्थानिक मुद्द्यांकडे दुर्लक्ष –
देशाची सत्ता काबीज केल्यावर केंद्रीय नेतृत्वाने राष्ट्रीय मुद्यावर जोर दिला. स्थानिक नेत्यांनी देखील स्थानिक मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले. परंतु भाजपकडून राष्ट्रीय मुद्दे रेटले गेले.

4. अमित शाहांच्या योजनेकडे दुर्लक्ष –
अमित शाहांच्या अनेकदा सांगण्यावरुन भाजपच्या सातही खासदार आणि स्थानिक नेत्यांनी आपच्या योजनेतील कमी शोधून काढली नाही.

5. निवडणूकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेत बदल –
शाहीन बाग, जेएनयू, जामिया यासारखे मुद्दे निवडणूकीच्या काळात समोर आले. या मुद्द्यावर आपला घेरण्याचा भाजपकडून प्रयत्न करण्यात आला, परंतु उपयोग झाला नाही. कारण दिल्लीच्या जनतेला हे माहित आहे की दिल्लीतील कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम केंद्र सरकारचे आहे, परंतु भाजप नेत्यांनी ही जबाबदारी केजरीवाल यांच्यावर ढकलली.

6. मोफत योजना बंद होण्याची भीती –
आपच्या मोफत वीज, पाणी, मोहल्ला क्लिनिक सारख्या योजना भाजपला आणता आल्या नाहीत. याउलट भाजपकडून आपच्या मोफत योजनांवर टीका करण्यात आली. भाजपच्या या टीकेने दिल्लीच्या जनतेत ही भीती निर्माण झाली की भाजप सरकार आल्यास या योजना बंद होतील.

7. उमेदवारांची निवड –
भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची निवड करण्यास जास्त वेळ लावण्यात आला. तर भाजप नेत्यांचा आरोप आहे की पक्षाने स्थानिक नेत्यांना संधी न देता बाहेरील नेत्यांना संधी दिली.

8. आक्रमक प्रचार –
भाजपकडून दिल्लीत आक्रमक प्रचार करण्यात आला. तर आपकडून जमिनीवरील मुद्द्यावर आणि 5 वर्षातील कामावर प्रचार करण्यात आला. भाजपकडून आक्रमक भाषा वापरली गेली आणि त्यासाठी त्यांना अनेकदा आपली वक्तव्य मागे देखील घ्यावी लागली.

9. कमकुवत बूथ मॅनेजमेंट –
स्थानिक नेता आणि उमेदवारांनी सभांवर जास्त लक्ष दिले परंतु जनसंपर्कात त्यांनी काम कमी केल्याचे दिसले.

10. स्थानिक नेत्यांकडे दुर्लक्ष –
भाजपने स्थानिक नेत्यांपेक्षा बाहेरील भाजप नेत्यांना दिल्लीत जमा करण्यावर भर दिला. बाहेरील राज्यातील भाजप नेत्यांची संख्या इतकी जास्त होती की स्थानिक नेत्यांचा प्रभाव कमी दिसला.