ATLAS सायकल कंपनीच्या मालकीणीची गळफास घेऊन आत्महत्या, परिसरात खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सायकल बनवणारी प्रसिद्ध कंपनी अ‍ॅटलस (Atlas Cycle)च्या मालकीनीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. ही बातमी ऐकल्यानंतर सर्वजण हादरून गेले आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. नताशा कपूर असं त्यांचं नाव आहे.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील औरंगजेब रोडवर असलेल्या एका घरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. सदर मृत महिला नताशा कपूर असल्याचं समजत आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेनंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. अनेकांनी या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे.

नताशा कपूर यांनी पंख्याला लटकून गळफास घेत आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेले पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. नताशा कपूर यांच्या पतीचं नाव संजय कपूर आहे.

फेसबुक पेज लाईक करा –