‘बाबा का ढाबा’च्या मालकाने यूट्यूबरच्या विरूद्ध केली तक्रार, जाणून घ्या प्रकरण
नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियवर स्टोरी वायरल झाल्यानंतर फेमस झालेले भोजनालय बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांनी इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आणि यूट्यूबर गौरव वासन यांच्याविरूद्ध पैशांची हेराफेरी केल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली.
पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत कांता प्रसाद यांनी आरोप केला आहे की, यूट्यूबर वासन यांनी जाणीवपूर्वक आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या बँक खात्याची माहिती आणि मोबाइल नंबर डोनेशन देणार्यांना शेयर केली. बाबा यांचे म्हणणे आहे की, गौरव वासन यांनी त्यांना याबाबत माहिती दिली नाही आणि डोनेशनची मोठी रक्कम आपल्या जवळ जमवून त्यामध्ये गडबड केली.
मदतीसाठी मिळालेल्या पैशात झाली गडबड
कांता प्रसाद यांनी सांगितले की, गौरव वासन यांनी व्हिडिओ शूट करून तो ऑनलाइन पोस्ट केला आणि सोशल मीडियावर जनतेला त्यांची आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. मदतीसाठी आलेला सर्व पैसा त्यांनी आपल्याकडेच ठेवला.
नुकतेच 80 वर्षाच्या कांता प्रसाद यांचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफार्मवर शेयर केल्यानंतर ते खुप फेमस झाले, त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप वायरल झाला होता, ज्यामध्ये त्यांनी लॉकडाऊनदरम्यान दुकान चालत नसल्याने आर्थिक तंगी बाबत आपले दु:ख मांडले होते. ढाबा मालक कांता प्रसाद यांनी यूट्यूबर गौरव वासन यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर केलेला व्हिडिओमध्ये आपल्या संघर्षाबाबत सांगितले होते.
सोशल मीडियातून फेमस झाले ढाबा मालक कांता प्रसाद
सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ व्यक्तीने सांगितले होते की, ते मालवीय नगरमध्ये एक ढाबा चालवतात. परंतु, धंद्यात इतकी मंदी सुरू आहे की, काहीच उत्पन्न मिळत नाही.
आपले म्हणणे मांडत असताना ही ज्येष्ठ व्यक्ती कॅमेर्यासमोर रडू लागली होती. त्यांचे आश्रू पाहून अनेकांचे हृदय द्रवले आणि आता देशभरातील लोक त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. यामध्ये अनेक नामवंत व्यक्तीसुद्धा आहेत. सर्वात चांगली गोष्ट ही आहे की, अनेक लोक तर ‘बाबा का ढाबा’वर सुद्धा पोहचले आहेत, ज्यामुळे पुन्हा एकदा या दाम्पत्याच्या चेहर्यावर हसू दिसू लागले आहे.