बार आणि पबमध्ये जाण्यापूर्वी जाणून घ्या सरकारच्या ‘या’ गाईडलाईन्स

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – भारतात अनलॉकचा चौथा टप्पा सुरु असून, देशात गेल्या दोन दिवसांपासून ८० हजारांच्यावरती रुग्णसंख्या आढळून येत असल्याने भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. अनलॉकच्या या टप्प्यात सरकारकडून हळूहळू अनेक निर्बंध हटवण्यात येत आहेत. अशातच दिल्लीत बार, पब आणि क्लबला ९ सप्टेंबरपासून मद्यविक्रीसाठी परवानगी देण्यात आलीय. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजान यांनी याबाबत दिल्ली सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

दिल्ली सरकारला मद्यविक्रीस परवानगी दिली असली तरी कोरोना संसर्गाचे सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन मद्यप्रेमी आणि बार चालकांनाही करावं लागणार आहे. सरकारकडून त्यासाठी नियम जारी करण्यात आले आहेत. ते खालीलप्रमाणे…

>> बार आणि पबच्या क्षमतेच्या ५० टक्के लोंकांनाच तिथे बसण्याची परवानगी मिळणार आहे.

>> ९ सप्टेंबरपासून हॉटेल, रेस्टॉरन्ट, बार आणि क्लब उघडले जातील. पण ३ सप्टेंबर पर्यंत हे केवळ ट्रायल बेसिसवर उघडण्यात येतील.

>> ज्या व्यक्तींना कोरोना संसर्गाची लक्षणे नसतील अशाच व्यक्तींना बार आणि पबच्या स्टाफमध्ये काम करण्याची परवानगी मिळेल.

>> थर्मल स्क्रिनिंगनंतर ग्राहकांना बार अथवा पबमध्ये प्रवेश दिला जाऊ शकतो.

>> प्रतिबंधित क्षेत्रात येणारे बार, पब आणि क्लब उघण्यावर बंदी असेल.

>> प्रवेशद्वार तसेच अन्य ठिकाणी सॅनिटायझर स्टँड लावण्यात येतील.

>> बार आणि पबमध्ये काम करणाऱ्या स्टाफने ग्लोव्ह्ज, फेस मास्क परिधान करण्यासोबतच सतत हात साफ करण्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

>> तसेच हॉटेल, रेस्टॉरन्टसाटी ४ जून रोजी केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमांचं पालन करावं.

>> यामधील कोणत्याही नियमांचं उल्लंघन करताना आढळल्यास ‘डिझास्टर मॅनेजमेंट अॅक्ट’ आणि भारतीय कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. संबंधित हॉटेल, रेस्टॉरन्टच्या मॅनेजरवर कारवाई केली जाईल. तसेच जागेची परवानगी काढून त्याला सील करण्यात येईल. एक्साईज लायसन्स रद्द करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.