चोरांनी ‘लंपास’ केला तरुणीचा मोबाईल, ‘मोबाईल’ परत मिळाला तेव्हा तरुणीला बसला ‘शॉक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत एक अजब किस्सा घडला आहे. एका मुलीकडून चोरांनी तिचा मोबाइल ओढून घेऊन पळ काढला होता. परंतू काही दिवसातच तिला तिचा मोबाईल परत मिळाला. यामुळे ती खूप आनंदात होती परंतू तिचा आनंद जास्त काळ टिकला नाही, जेव्हा तिच्या हे लक्षात आले की मोबाइल चोरांनी तिच्या बरोबर मस्करी केली आहे. कारण या तरुणीला नंतर लक्षात आले तिला परत मिळालेला मोबाइल तिचा नाही.

या प्रकारानंतर या तरुणीला धक्का बसला, परंतू यात देखील एक दिलासा या तरुणीला मिळाला. या तरुणीला मोबाईल देताना एका व्यक्तीने या प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला. या व्हिडिओच्या आधारे आता या चोरट्यांचा शोध सुरु आहे. दिल्लीच्या डेप्युटी कमिश्नर विजयंता आर्या यांनी सांगितले की, या व्हिडिओची तपासणी करण्यात येईल आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आता तपास करता येईल.

हा प्रकार शुक्रवारी दिल्लीच्या मुखर्जी नगरच्या कोरोनेशन पार्क येथे घडला, जेव्हा तरुणी ई-रिक्षाने किंग्सवे कॅपच्या दिशेने जात होती. तरुणीने सांगितले की, मी माझा फोन ई-रिक्षा मध्ये माझ्या बाजूला ठेवला त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी माझा फोन पळवला. मी लगेचच रिक्षातून उतरले आणि एका कार ड्रायव्हरच्या मदतीने त्यांचा पाठलाग केला.

कार चालकाने त्यांना काही अंतरावर पकडले. कार चालकाने त्या चोरट्यांशी बोलतानाचा व्हिडिओ मोबाइलमध्ये घेतला. त्या कार चालकाने त्यांना दम भरल्यानंतर त्या चोरट्यांनी तरुणीला फोन परत केला. जेव्हा कार चालकाने तरुणीचा मोबाइल त्या चोरट्यांकडून परत घेतला आणि तरुणीला दिला परंतू नंतर लक्षात आले की तो फोन पांढरा आहे आणि तरुणीचा फोन काळा होता. त्यात सिमकार्ड देखील नव्हते आणि हा फोन एरोप्लेन मोडवर होता.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like