अरविंद केजरीवाल यांना कोरोना संसर्ग नाही, चाचणी अहवाल आला ‘निगेटिव्ह’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कोविड 19 अहवाल नकारात्मक आला आहे. मंगळवारी त्यांचा अहवाल आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. रविवारी संध्याकाळी केजरीवाल आजारी होते, त्यांना घशात खवखव तसेच हलका ताप होता. ही बातमी सोमवारी आली, त्यानंतर मंगळवारी त्यांची कोरोना टेस्ट झाली. यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्वत: ला क्वारंटाईन केले. मात्र या दरम्यान, ते ट्विटरवर अ‍ॅक्टिव्ह होते.

मंगळवारीच घेण्यात आला नमुना

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कोरोना चाचणीसाठी मंगळवारीच नमुना घेण्यात आला. माहितीनुसार मुख्यमंत्र्यांची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी केजरीवाल यांची तब्येत ढासळल्याची माहिती समोर आली. यामुळे त्यांनी दुपारी होणारी सभा देखील रद्द केली आणि स्वत: ला क्वारंटाईन केले. त्याच वेळी डॉक्टरांनी त्यांना कोविड- 19 चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सीएम केजरीवाल यांना रविवारपासून हलक्या तापाची तक्रार आहे.

सभेपासून स्वत: ला केले होते वेगळे

मुख्यमंत्री केजरीवाल रोज दुपारी दिल्लीतील कोरोना प्रकरणाबद्दल स्वत: माध्यमांशी बोलत आले आहेत. परंतु सोमवारी ताप आणि घशात दुखण्याची तक्रार आल्यानंतर त्यांनी दुपारी झालेल्या सभेपासून स्वत: ला दूर केले. दिल्लीतील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांचे स्वतःचे आरोग्य बिघडल्याच्या बातम्यांमुळे दिल्ली सरकार आणि आरोग्य विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या आरोग्याबाबत खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, एखादे राज्याचे मुख्यमंत्री आयसोलेशनमध्ये जाण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी, उत्तराखंडमधील मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्या मंत्रिमंडळात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह 3 मंत्र्यांना सेल्फ- क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

मनीष सिसोदिया पहात होते काम

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली सरकारचे कामकाज पाहत होते. मंगळवारीच मनीष सिसोदिया यांनी एलजीशी भेट घेतल्यानंतर सांगितले की, 31 जुलैपर्यंत दिल्लीसाठी 80,000 बेड लागतील. सिसोदिया म्हणाले की, एलजी साहब यांनी संपूर्ण आढावा न घेता दिल्ली सरकारचा निर्णय बदलला. सिसोदिया म्हणाले की केजरीवाल सरकार दिल्लीबरोबरच देशातील जनतेलाही दिल्लीत योग्य उपचार मिळावे अशी पूर्ण तयारी करेल.