CM केजरीवालांनी सादर केलं दिल्ली सरकारचं ‘रिपोर्ट’ कार्ड, म्हणाले – ‘खर्चाचा हिशोब देणं माझं कर्तव्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणूक आता जवळ आली आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. यासंबंधित गुरुवारी मावळंकर हॉलमध्ये एका प्रचार सभेला संबोधित करताना अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकारचे रिपोर्ट कार्डचं जनतेसमोर सादर केले.

भारत माता की जयच्या नाऱ्यांनी भाषणाला सुरुवात –
अरविंद केजरीवाल यांनी भारत माता की जय म्हणत भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की आपण सगळे शाळेत शिकताना रिपोर्ट कार्ड होते. आपण रिपोर्ट कार्ड आणत होतो, मी देखील रिपोर्ट कार्ड आणले आहे आणि मी आता खूप आनंदीत आहे. शिक्षण घेताना एक चांगला विद्यार्थी होतो, पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असायचो. लोकशाहीत जनताच सर्व काही असते. मी आता पाच वर्षांचे रिपोर्ट कार्ड घेऊन आलो आहे. पाच वर्षापूर्वी तुम्ही निवडून पाठवले. पाच वर्ष कर भरला आणि सांगितले की आमचा विकास करा. त्यामुळे आता माझं हे कर्तव्य आहे की मी सर्व खर्चाचा हिशोब तुम्हाला देणं.

आरोग्यावर अर्थसंकल्पाच्या 13 टक्के खर्च करणारे दिल्ली एकटे राज्य –
यावेळी बोलताना केजरीवाल म्हणाले की आरोग्यावर अर्थसंकल्पाच्या 13 टक्के खर्च करणारे दिल्ली एकटे राज्य आहे. अर्थसंकल्प 3500 कोटींने वाढून 7500 कोटी रुपये झाले आहे. आता दिल्लीच्या सरकारी रुग्णालयात मोफत उपचार होतील. अनेक मोहल्ला क्लिनिक सुरु करण्यात आले आहे.
केजरीवाल म्हणाले की मला आनंद आहे की पाच वर्ष आम्ही बऱ्याच मुद्द्यावर काम केले जे देशाच्या प्रगतीसाठी महत्वाचे असते. शिक्षण आणि आरोग्य याशिवाय कोणताही देश पुढे जाऊ शकत नाही. जोपर्यंत कोणताही देश विकास करत नाही जोपर्यंत लोक शिक्षित नसतात.

आम्ही चांगल्या शिक्षणाची सोय केली –
ते म्हणाले की खासगी शाळांची अवस्था वाईट होती. तेथे गुंडगिरी सुरु झाली होती. कधीही शुल्क वाढत होते. परंतु आम्ही सरकारी शाळेतील शिक्षण चांगले केली. दरवर्षी 12 वीचे निकाल चांगले येऊ लागले आहेत. शिक्षणासाठी आता कर्ज मिळते कारण दिल्ली सरकार कर्जाची गॅरंटी घेते.

दिल्लीत वीज मोफत –
केजरीवाल म्हणाले की, मी 2013 साली उपोषण केले. मी उपोषण यासाठी केले की वीज बील कमी केले जावे. अनेकांनी सांगितले की वीज स्वस्त होऊ शकत नाही. दिल्लीत आमचे सरकार आले. आता दिल्लीत वीज स्वस्त झाली आहे. लोकांना झिरो बील येते. ते म्हणाले की कच्ची कॉलनीच्या मुद्द्यावर सर्व पक्षांनी दिशाभूल केली. 1130 सीवरची लाइन आता टाकण्यात आली आहे. पुढील काम येत्या पाच वर्षात पूर्ण होईल. तुमच्यासाठी घरबसल्या डिलिव्हरी होईल.

नाव न घेता काँग्रेसवर निशाणा –
केजरीवाल म्हणाले की एका दुसऱ्या पक्षाने सांगितले होते की आम्ही 600 यूनिटपर्यंत वीज मोफत देऊ. त्यांचे पाच राज्यात सरकार आहे. त्यांनी ते त्यांच्या राज्यात करावे.

पाच वर्षात एकही टॅक्स वाढवला नाही –
केजरीवाल म्हणाले की स्थानिक लोकांशी थेट संवाद आणि लोकांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं दिली. एवढी सगळे फ्री कसे यावर बोलताना केजरीवाल म्हणाले की पाच वर्षात एक देखील टॅक्स वाढवला नाही. ते म्हणाले की दिल्ली सरकार फायद्यात चालत आहे. पाच वर्षापूर्वी सरकार फायद्यात नव्हते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/