‘दिल्ली’च्या सरकारी रुग्णालयातील ‘VIP’ संस्कृती ‘बंद’ ! ‘कोणालाही’ मिळणार नाही ‘खासगी’ रुम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या राजधानीत सरकारी रुग्णालयात मिळणारे VIP संस्कृती केजरीवाल सरकारने बंद केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आदेश दिले की, सरकारी रुग्णालयात आता प्रायवेट रुम म्हणजेच खासगी खोल्या नसणार आहेत. त्यामुळे आता सर्वच रुग्णांना एक सारखा उपचार मिळणार आहे. आता रुग्णालयात सर्वांना समान सुविधा मिळणार आहेत. दिल्ली सरकारने रुग्णालयात 13,899 बेड वाढण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दिल्लीच्या सरकारी रुग्णालयात 11,353 बेड आहेत.

रुग्णालयात असणार सुविधा, लावणार एसी –
दिल्ली सरकारने सरकारी रुग्णालयातील सुविधा वाढवली आहे. सर्व रुग्णालयात एअर कंडिशन (एसी) लावण्यात आले आहेत. यात छोट्या रुग्णालयाचा देखील समावेश आहे. सध्या फक्त मोठ्या रुग्णालयात एसीची सुविधा आहे. यासंबंधित काम सुरु आहे.

नव्या रुग्णालयाची उभारणी करणार –
दिल्लीतील आरोग्य सेवांबाबत आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अहवाल पाठवला की, दिल्लीतील काही भागात नवे रुग्णालय उभारण्यात यावेत. यासाठी कॅबिनेटकडून मंजूरी देण्यात आली आहे. तसेच टेंडर देखील काढण्यात येणार आहे. खिचडीपूरच्या लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात एक नवे मदर अँण्ड चाइल्ड ब्लॉक मिळेल, ज्यात 460 बेड असतील. याशिवाय आंबेडकर नगर आणि बुराडी येथे दोन रुग्णालये तयार करण्यात आले आहे.

Loading...
You might also like