Delhi CM Arvind Kejriwal | ‘…तर 2024 मध्ये देशात मोदी सरकार येणार नाही’, अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं राजकारण (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रातील भाजप सरकारच्या (BJP Government) हुकूमशाही स्वरुपाच्या वटहुकूमाला विरोधी पक्षांची एकजूट होऊन संसदेत पराभूत करावे यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) हे सर्व विरोधी पक्षनेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यानिमित्ताने केजरीवाल यांनी बुधवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्री येथे भेट घेतली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे उपस्थित होते. यावेळी केजरीवाल यांनी मोदी सरकारवर (Modi Government) गंभीर आरोप केले. लोकशाही आणि सर्वोच्च न्यायालयाही (Supreme Court) मोदी सरकार मानत नाही. आम्ही करु तेच, अशा अविर्भावात, गर्वाने वागत असल्याचे केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी म्हटलं.

 

उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांची मातोश्रीवर संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना मोदी सरकारने दिल्ली सरकार विरुद्ध (Government of Delhi) वटहुकूम काढत हुकूमशाही केल्याचे म्हटले. तसेच राज्यसभेत या अध्यादेशासंदर्भातील विधेयक मांडलं जाईल, त्यावेळी शिवसेना (Shivsena) याचा विरोध करेल, तसेच आम्हाला समर्थन करेल, असे वचन उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दिले आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले. जर हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं नाही, तर 2024 मध्ये देशात मोदी सरकार येणार नाही, असं भाकित अरविंद केजरीवाल यांनी केलं.

 

केजरीवाल पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने निवडून आलेल्या दिल्ली सरकारला सर्व अधिकार दिले होते. परंतु केंद्र सरकारने नवीन अध्यादेश (Ordinance) काढत दिल्ली सरकारचे सर्व अधिकार हे राज्यपालांना दिले. म्हणजे आम्ही लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला, म्हणजेच लोकशाहीलाच मानत नाही आणि सर्वोच्च न्यायालयालाही मानत नाही, अशीच भूमिका मोदी सरकारची असल्याचे केजरीवल म्हणाले. अध्यादेशाचा निर्णय अहंकारातून आला आहे. अहंकारी आणि स्वार्थी माणूस देश चालवू शकत नाही. दिल्लीच्या लढाईत ठाकरेंची साथ मिळाल्याचे केजरीवाल यांनी सांगितलं.

 

Advt.

उद्या शरद पवारांची भेट घेणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांची मंगळवारी (दि.23) भेट घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल संध्याकाळी मुंबईत दाखल झाले. बुधवारी (दि.24) त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
तर गुरुवारी (दि.25) राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत.
याआधी केंद्राच्या अध्यादेश संदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar)
यांची देखील अरविंद केजरीवाल यांनी भेट घेतली होती.

 

 

 

Web Title :  Delhi CM Arvind Kejriwal | then the modi government will not come back to
power in 2024 arvind kejriwal said political reason

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा