NRC वरून राजकारण तापलं, BJP नेत्याची मुख्यमंत्र्यांविरूध्द पोलिसांकडे तक्रार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय नागरिक रजिस्टर म्हणजेच एनआरसी वरून आता दिल्लीत देखील राजकारण सुरु झाले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. जर हि योजना दिल्लीत लागू झाली तर सर्वात आधी तिवारी यांना दिल्ली सोडावी लागेल असे वक्तव्य केजरीवाल यांनी केले होते.

दिल्लीतील भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आमदार सौरभ भारद्वाज यांच्याविरोधात संसद मार्गावरील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मिश्रांव्यतिरिक्त भाजपच्या नीलकांत बख्शी यांनी देखील यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात अफवा पसरवणे, शांती भंग करणे, सोशल मीडियाचा चुकीचा आरोप करणे तसेच दिल्लीत राहणाऱ्या बिहारी लोकांच्या भावना दुखावण्याचा आरोपाखाली तक्रार दाखल केली गेली आहे.

गुरुवारी भाजप पूर्वांचल मोर्च्याच्या कार्यकर्त्यांकडून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानाबाहेर आंदोलन केले जाणार आहे. तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये या गोष्टीबाबत जनसंपर्क अभियान सुद्धा सुरु केले जाणार आहे.

काय आहे नेमका हा प्रकार 
जर NRC योजना दिल्लीत लागू झाली तर सर्वात आधी मनोज तिवारी यांना दिल्ली सोडावी लागेल असे वक्तव्य केजरीवाल यांनी केले होते. तसेच आम आदमीचे प्रवक्ता सौरभ भारद्वाज यांनी वक्तव्य केले होते की, भाजप दिल्लीत एन आर सी लागू करून बिहारी आणि उत्तर प्रदेशच्या लोकांना पळवून लावू इच्छित आहे.

सौरभ भारद्वाज म्हणाले की भाजपचचे मनोज तिवारी यांनी एक दिवस जरी आपल्या ऑफिसध्ये बसून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या असत्या तरी त्यांच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या असत्या की लोकांना यामुळे किती त्रास हात आहे. जेव्हा एखादी विधवा महिला किंवा जेष्ठ नागरिक आपली पेन्शन घेण्यासाठी येतात तेव्हा पाच वर्षांपूर्वीचे आवासी प्रमाणपत्र शोधणे देखील मुश्किल होते आणि तिवारी यांची ही इच्छा आहे की दिल्लीत राहणाऱ्या बिहारी आणि उत्तप्रदेशच्या लोकांकडून 1971 पासूनचे प्रमाणपत्र मागितले जावे.