अन् त्या ‘पक्ष्या’ला मिळाला तिरंग्याचा सन्मान

दिल्ली : वृत्तसंस्था
लष्करी अधिकारी,जवान, नागरी सन्मान प्राप्त नागरिकांच्या निधनानंतर त्यांच्या शासकीय इतमामात तिरंग्यात लपेटून अंत्यसंस्कार केले जातात दिल्ली पोलिसांनी भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर याला हा सन्मान देत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आहे़

दिल्लीतील उच्च न्यायालयाच्या द्वार क्रमांक : ५ जवळ एक मोर जखमी अवस्थेत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्याला तातडीने चांदणी चौकातील ‘जैन बर्ल्ड हॉस्पिटल’मध्ये नेले पण तेथे उपचार सुरु करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी दक्षिण दिल्लीतील जौनापूर येथे नेऊन त्याचे शवविच्छेदन करवून घेतले त्यानंतर त्याच्या मृतदेहाला तिरंगा लपेटून त्याला मानवंदना देऊन दफन केले.

मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. आम्ही प्रोटोकॉलनुसार त्याचे दफन केले, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.
मोर हा वाईल्ड लाईफ अ‍ॅक्टनुसार शेड्युल एकचा पक्षी आहे. त्यानुसार या पक्षावरील अंत्यसंस्कार हे वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली झाले पाहिजे होते, असे प्राणीप्रेमींचे म्हणणे आहे.