Coronavirus : दिल्लीत 24 तासात ‘कोरोना’चे 1106 नवे रूग्ण, आतापर्यंत 398 जणांचा मृत्यू, सिसोदिया म्हणाले – ‘घाबरू नका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाची राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोनाच्या नवीन प्रकरणांनी सर्व विक्रम मोडले आहेत. २४ तासांत दिल्लीत ११०६ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तसेच कोरोनामुळे मृत्यूची संख्या चारशेच्या जवळपास पोहोचली आहे. दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या संख्येबाबत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.

मनीष सिसोदिया म्हणाले की, दिल्लीत रुग्णांची संख्या वाढत आहे, पण रुग्ण बरे देखील होत आहेत. सुमारे ५० टक्के लोक बरे होत आहेत. ते म्हणाले की, असे दिसून येत आहे की ८० टक्के लोक घरीच राहून बरे होत आहेत, त्यामुळे लोकांना घाबरून जाण्याची गरज नाही.

ते पुढे म्हणाले की, खोकला, ताप असेल आणि कोरोनाचे लक्षण नसेल तर रुग्णालयात जाण्याची गरज नाही. आपण घरीच एका स्वतंत्र खोलीत राहू शकता आणि काळजी घेऊ शकता. कोरोना काही स्पर्शातून होणारा आजार नाही, कोरोना स्पर्शामुळे होत नाही.

सत्येंद्र जैन यांनी दिली ताज्या आकडेवारीची माहिती
याच पत्रकार परिषदेत दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले की, दिल्लीत आतापर्यंत १७३८६ प्रकरणे समोर आली आहेत, गेल्या एका दिवसात ११०६ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर गेल्या २४ तासात १३ लोकांचा मृत्यू झाला आहे, त्याशिवाय ६९ जुन्या मृत्यूंची नोंद केली गेली आहे.

दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत कोरोनामुळे आतापर्यंत ३९८ मृत्यू झाले आहेत. या व्यतिरिक्त आतापर्यंत एकूण ७८४६ लोक बरे झाले आहेत.

विशेष म्हणजे दिल्लीत गेल्या एका आठवड्यात कोरोनाच्या प्रकरणांत वाढ दिसून आली. एका आठवड्यातच पाच हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like