Delhi Coronavirus Updates : दिल्लीत ‘कोरोना’ फुल स्पीडमध्ये; 11 दिवसांत 768 मृत्यू, आणखी वाढू शकतो धोका !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवाळीचा सण जवळ आला आहे आणि दिल्लीत कोरोना प्रकरणे रोज विक्रम मोडत आहेत. स्थिती ही आहे की, राजधानीत पहिल्यांदा एका दिवसात 100 पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यादरम्यान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सणांमुळे बाजारात असलेली गर्दी आणि प्रदूषणामुळे दिल्लीत कोरोनाचा धोका आणखी वाढू शकतो.

कोरोना संकटाबाबत दिल्ली अतिशय वाईट काळातून जात आहे. सणामुळे बाजारात गर्दी दिसत आहे, तर हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांची संख्यासुद्धा वाढत आहे. नव्या प्रकरणांसह दिल्लीत कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूंचा आकडासुद्धा भीती दाखवू लागला आहे.

पहिल्यांदा एका दिवसात 104 लोकांचा मृत्यू
यापूर्वी 16 जूनला 93 रुग्णांचा मृत्यू झाला होता
24 तासात 7000 पेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण
अ‍ॅक्टिव्ह केस 43,000 पेक्षा जास्त (जो एका दिवसातील सर्वांत मोठा आकडा)

दिल्लीत कोरोना फुल स्पीडमध्ये आहे. हिवाळ्यासह कोरोना प्रकरणे वाढण्याचा इशारा देण्यात आला होता. इतकेच नव्हे, मॉल, चित्रपटगृह आणि मेट्रोसह सर्व सार्वजनिक वाहतूक खुली झाल्यानंतर लोकांना खबरदारी घेण्याचा इशारा दिला होता. परंतु, दिवाळीपूर्वी बाजारात उसळलेली गर्दी सांगत आहे की, दिल्लीसाठी धोका आणिखी वाढू शकतो.

दिल्लीचे कोरोना आकडे
मागील 24 तासात नवीन प्रकरणे – 7053
आतापर्यंत एकूण प्रकरणे – 4,67,028
मागील 24 तासात बरे झालेले रुग्ण – 6462
आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण – 4,16,580
मागील 24 तासात झालेले मृत्यू – 104
आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू – 7332
अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे – 43,116 (आतापर्यंत सर्वांत जास्त)
मागील 24 तासात केलेल्या टेस्ट – 60,229
आतापर्यंत झालेल्या एकूण टेस्ट – 53,22,274.